road extension Jalindar Kamthe  esakal
पुणे

Pune : खडी मशिन ते बोपदेव घाट रस्ता रुंदीकरणास निधी द्या - जालिंदर कामठे

राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना कामठे यांनी निवेदन दिले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर असलेल्या कोंढवा-येवलेवाडी येथील खडी मशिन चौकापासून सासवडकडे जाणाऱ्या बोपदेव घाटापर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण करावे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केली आहे.

या मागणीसाठी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना कामठे यांनी निवेदन दिले आहे. खडी मशिन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोपदेव घाटाबरोबरच भिवरी, हिवरे, सासवड ही गावे आहेत. त्यामुळे या गावांमधील आणि सासवड येथील नागरिक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी खुपच अरुंद पडू लागला आहे.

याउलट वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी अरुंद असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता निरा फलटण या मार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण होणे गरजेचे असल्याचे कामठे यांनी बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करण्याचा आदेश चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT