cp.jpg
cp.jpg 
पुणे

खडकी बाजार पेठ केव्हा राहणार सुरू पाहा...

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार : राज्य सरकारच्या आदेशानुसार बाजारपेठ उघडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने कॅन्टोन्मेंट हद्दीमध्येही करण्यात येत होती मात्र बोर्डाच्या हददीत कोरोना बधितांची संख्या वाढत होती याकरिता बोर्डाने आठवड्यातून तीन दिवस बाजारपेठ बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र बोर्डाचे उपाध्यक्ष व सदस्यांनी खडकीतील वयापाऱ्यांसाठी बाजार नियमित सहा दिवस सुरू करण्याची विनंती बोर्डाकडे केली. यामुळे बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम. जे. कुमार यांनी बाजार उघडण्यासाठी मान्यता दिली. खडकी बाजार आता मंगळवार ते रविवार सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडे राहणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह यांनी दिली.

खडकी बाजारातील सर्व प्रकारच्या दुकानांना बोर्डाने परवानगी दिली आहे. मागील काही दिवसांपासून खडकी बोर्डाच्या आदेशानुसार आठवड्यातून चार दिवस बाजार उघडत असे व तीन दिवस बाजार बंद असे याकरिता खडकीतील काही व्यापार्यांनी बोर्डाला संपूर्ण दिवस बाजार उघडण्याची परवानगी द्यावी असे निवेदन दिले.

त्यानंतर व्यापाऱ्यांच्या वतीने बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर व सदस्यांनीही बोर्डाकडे बैठक घेऊन चर्चा व मागणी केल्यामुळे सदस्यांच्या विनंतीस मान देऊन प्रमोदकुमार सिंह यांनी तसा प्रस्ताव अध्यक्ष ब्रिगेडियर एम. जे. कुमार यांच्याकडे पाठवला असता अध्यक्षांनी त्यास मान्यता दिली असल्याची माहिती सिंह यांनी दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारपासून खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील व फळांची 20 आणि भाजीची 40 अशी एकूण 60 च हातगाडी स्टॉलला सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली असून, ठोक भाजी मंडई (दांडी)  चौपाटीजवळ पहाटे  4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार प्रत्येक सोमवारी मात्र सर्व बाजारपेठ बंद असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT