पुणे

लोणंद - खंडाळा कारखाना निवडणूकीसाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल.

CD

‘खंडाळा’साठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल

लोणंद, ता. २६ : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी एकूण ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, १२ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीसाठी साखर कारखान्याच्या विद्यमान व माजी संचालकांनी उमेदवारीमध्ये अर्ज दाखल केले आहेत. खंडाळा साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. शेवटच्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या अर्जामध्ये खंडाळा ऊस उत्पादक गट क्रमांक एकमधून १२ अर्ज, शिरवळ ऊस उत्पादक गट क्रमांक दोनमधून सहा अर्ज, बावडा ऊस उत्पादक गट क्रमांक तीनमधून १९ अर्ज, भादे ऊस उत्पादक गट क्रमांक चारमधून १६ अर्ज, लोणंद ऊस उत्पादक गट क्रमांक पाचमधून २१ अर्ज, उत्पादक संस्था मधून सहा अर्ज, तर अनुसूचित जाती मतदारसंघातून चार अर्ज दाखल झाले आहेत.
महिला राखीव मतदारसंघातून आठ अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागासवर्गातून आठ, तर भटक्या विमुक्त जातीमधून १३ अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. प्रगती बागल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रीती काळे व अनिल क्षीरसागर हे काम पाहत आहेत. खंडाळा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होणार, की निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
-----------------------------------------

चौकट
या दिग्गजांनी केले अर्ज दाखल
खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र ऊर्फ अनंत तांबे, संचालक चंद्रकांत ढमाळ, रमेश धायगुडे- पाटील, शिवाजीराव शेळके- पाटील, विठ्ठल धायगुडे, रत्नाकांत भोसले, शालिनी पवार, धनाजी अहिरेकर, डी. एम. भोसले, तसेच दत्तानाना ढमाळ, अनिरुद्ध गाढवे, लोणंद बाजार समितीचे सभापती सुनील शेळके- पाटील, हणमंतराव साळुंखे, तात्यासाहेब धायगुडे, बापूराव धायगुडे, राहुल घाडगे, बाळासाहेब शेळके, डॉ. अनिलराजे निंबाळकर, शंकरराव क्षीरसागर, ॲड. सुभाषराव घाडगे, विठ्ठलराव यादव, किसनराव धायगुडे, नंदकुमार धायगुडे, धनाजी डेरे, राजेंद्र कदम, साहेबराव महांगरे, संभाजीराव जाधव- पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी उत्साहात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT