केळी लागवडीसाठी
दर्जेदार कंद मिळेनात
खानदेशात लागवड रखडत; कंदांसाठी इतर जिल्ह्यांत धाव
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात मृग बहर (जून व जुलैमध्ये लागवडीच्या बागा) केळी हंगामातील उशिराची केळी पीक लागवड सुरू आहे. परंतु दर्जेदार व हवे ते कंद मिळत नसल्याने लागवड रखडत सुरू आहे.
अनेक शेतकरी एकाच कंपनीच्या उतिसंवर्धित केळी रोपांच्या काढणी पूर्ण झालेल्या बागेतील ग्रॅण्ड नैन वाणांच्या कंदांची शोधाशोध करीत आहेत. या कंदांचा तुटवडा दिसत आहे. जुनारी (काढणी ९७ ते ९८ टक्के पूर्ण झालेल्या बागा) आणि काढणी ९० टक्के पूर्ण झालेल्या पिलबाग किंवा खोडवा केळी पिकातून कंद आणावे लागत आहेत. खोडवा व जुनारी केळी बागांमधील कंद हवे तसे अंकुरत नाहीत. तसेच काही कंपन्यांच्या उतिसंवर्धित केळी रोपांच्या बागांमधील कंदांच्या केळी बागेत हवे तसे उत्पादन येत नाही, असाही अनुभव शेतकऱ्यांना आहे. पुढे त्यांची निसवण, काढणी या बाबतही अडचणी असतात. यामुळे शेतकरी काढणी ६० ते ७० टक्के पूर्ण झालेल्या केळी बागांमधील कंद काढून त्यांची पुनर्लागवड करतात. परंतु कंदांचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना कंदांसाठी इतर जिल्ह्यांतही जावे लागत आहे.
चौकट
मध्य प्रदेशातही पोचताहेत शेतकरी
अनेक शेतकरी मध्य प्रदेशातील बडवाणी, बऱ्हाणपूर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, गुजरातमधील निझर किंवा तापी जिल्ह्यातूनही कंद आणत आहेत. उतिसंवर्धित रोपांची मागणीही आहे. परंतु रोपांचे दर १८ ते २१ रुपये प्रति रोप, असे आहेत. अनेक शेतकरी खर्च कमी करण्यासाठी रोपांचा उपयोग टाळून कंदांना पसंती देतात.
चौकट ----
पारंपरिक वाण दुरापास्त
यात खानदेशात कमाल शेतकरी किंवा केळी उत्पादक नव्याने लागवडीसाठी काढणी सुरू असलेल्या उतिसंवर्धित बागांमधील ग्रॅण्ड नैन वाणाच्या कंदांना पसंती देतात. तसेच काही शेतकरी सातमासी, आंबेमोहोर, श्रीमंती व इतर वाणांना पसंती देतात. पण खानदेशात विविध पारंपरिक वाणांचे कंदही दुरापास्त झाले आहेत. काढणी सुरू असलेल्या बागांतून शेतकरी कंद देण्यास नकार देत आहेत. यामुळे कंदांचा तुटवडा आहे.
चौकट ---
कंददर स्थिर
कंदांची विक्रीही आता मोठा व्यवसाय खानदेशात बनला आहे. पूर्वी शेतकरी आपल्या बागांमधील कंद मोफत द्यायचे, परंतु आता मोफत कंद अपवादानेच मिळतात. अनेक शेतकरी चार ते पाच रुपये दर (मजुरीसह) घेऊन कंद देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.