पुणे

खानदेशातील जिनींग प्रेसिंग कारखान्यांत प्रक्रिया संथच

CD

खानदेशातील जिनींग प्रेसिंग
कारखान्यांत प्रक्रिया संथच

सणासुदीसह कमी आवकेने कापूस प्रक्रियेवर परिणाम

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी नवरात्रोत्सवात गतीने सुरू झाली. पण सध्या सणासुदीसह कमी कापूस आवकेने या कारखान्यांत कापूस प्रक्रिया रखडत सुरू आहे.

खानदेशात अद्याप ८० टक्के जिनींग प्रेसिंग कारखाने बंद आहेत. जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पारोळा भागात आघाडीचे कारखाने सुरू आहेत. पण तेथेही प्रक्रिया १०० टक्के क्षमतेने सुरू नाही. कारण पाऊसमान कमी राहीले. कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती बिकट आहे. कापूस उत्पादन कमी झाल्याने अडचणी आहेत.

चौकट
कारखानदार सावध भूमिकेत
कापूस बाजार मागील काही दिवसात अस्थिर झाल्यानेही काही कारखानदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. कापसाची खेडा किंवा थेट खरेदी खानदेशात केली जाते. ही खेडा खरेदी दिवाळी, कोजागिरी पौर्णिमेच्या काळात गती घेते. पण यंदा दसरा सणातही कापूस आवक कमी होती. आता दिवाळी सणही कमी कापूस आवकेचा राहील, असे दिसत आहे.

चौकट
दर्जेदार कापूस उपलब्ध
बागायती किंवा पूर्वहंगामी क्षेत्रातील कापूस वेचणीवर येताच पाऊस नव्हता. कोरडे वातावरण सप्टेंबरपासून आहे. यामुळे कापसाची वेचणी काहीशी लवकर सुरू झाली. ही वेचणी गतीने सुरू आहे. पण लागवड कमी असल्याने कापूस आवकही कमी आहे. दुसरीकडे कापसाची खेडा खरेदीही हवी तशी सुरू झालेली नाही. दर्जेदार कापूस यंदा आहे. कारण परतीच्या पावसाचा फारसा तडाखा पूर्वहंगामी पिकास बसला नाही.

चौकट
दिवाळीनंतर प्रक्रियेस गती शक्य
सुमारे १२० ते १३० कारखाने दरवर्षी खानदेशात कापसावर प्रक्रिया करतात. एका कारखान्यास रोज किमान ८० ते ९० क्विंटल कापसाची गरज असते. परंतु कापसाची आवक कमी आहे. त्यात आता सणासुदीमुळे प्रक्रिया रखडत सुरू आहे. कापूस प्रक्रिया दिवाळीनंतर किंवा पुढील महिन्यात गती घेईल. खानदेशात सुमारे १५० जिनींग प्रेसिंग कारखाने आहेत. त्यात कापसापासून सरकी व रुई तयार केली जाते. हे कारखाने सर्वत्र खासगी व्यवस्थापनाचे आहेत. यामुळे यात कार्यप्रणालीचे सर्व निर्णय कारखानदार, मालक घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तिरंगा फडकवणे गुन्हा मानला जाऊ नये - आशुतोष रांका

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT