खानदेशात पेरण्यांची गती वाढू लागली
यंदा किमान पावणेतीन लाख हेक्टरवर रब्बी क्षेत्र
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात पाऊसमान कमी होते. यामुळे रब्बीत पेरण्यांची टक्केवारी कमी राहणार आहे. पण, पेरणी बऱ्यापैकी गतीने झाली असून, सणासुदीचा काळ आटोपल्याने मका, गहू पेरणीस गती आली आहे.
एकूण पेरणी ३३ टक्क्यांवर झाली आहे. सर्वाधिक पेरणी किंवा लागवड हरभऱ्याची झाली आहे. यंदा सुमारे ८० टक्केच रब्बी पेरा होईल, अशी अपेक्षा आहे.
मागील हंगामात ११० टक्के पेरा खानदेशात झाला होता. बागायती क्षेत्रात केळीसह हरभरा, ऊस, भाजीपाला व अन्य रब्बी पिकांची पेरणी झाली होती.
यंदा खानदेशात कमी पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत ८० टक्के पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्याचे एकूण पाऊसमान ६३२ मिलमीटर, धुळ्याचे ५६५ मिलिमीटर व नंदुरबारचे ८५२ मिलिमीटर एवढे एकूण पाऊसमान आहे. सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस खानदेशात झाला आहे.
कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची पेरणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. आता ज्यांच्याकडे मुबलक कृत्रीम जलसाठे आहेत, त्यांनी मका, गहू पेरणी दिवाळी सण आटोपल्यानंतर सुरू केली आहे. मका लागवड पुढे महिनाभर सुरूच राहील. ही लागवड तापी, अनेर, गिरणा नदीच्या क्षेत्रात होईल.
---- चौकट ----
हरभऱ्याचा अधिक पेरा
खानदेशात सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची केली जाते. कमी पाणी व खर्चही कमी लागतो. जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर रब्बीची लागवड अपेक्षित आहे. त्यात हरभऱ्याची एक लाख हेक्टरपर्यंत राहील, अशी अपेक्षा आहे. धुळ्यात सुमारे ४० ते ४२ हजार हेक्टरवर, तर नंदुरबारात सुमारे ४५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे. खानदेशात यंदा किमान पावणेतीन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे.
---- चौकट ----
मक्यास मुबलक जलसाठ्याच्या भागात पसंती
खानदेशात मका लागवडीसही काही शेतकरी पसंती देत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५ ते ५० हजार हेक्टरवर मका लागवड होवू शकते. दिवाळीच्या काळात हरभऱ्यापाठोपाठ यंदा मका, ज्वारीची पेरणी केली जात होती. अनेकांनी भाजीपाला पिकांना पसंती दिली. जळगाव जिल्ह्यात रब्बीची सुमारे ३७ टक्के पेरणी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.