--- पान ६ खानदेश ----
खानदेशात रब्बी पीककर्जाचे
१० टक्केही वितरण नाही
दुष्काळी निर्बंध असतांना बँकांकडून वसुली
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात रब्बी पीक कर्ज वितरण १० टक्केही झालेले नाही. सुमारे १२०० कोटी रुपये पीककर्ज वितरित करायचे आहे. रब्बी हंगाम अधिकृतपणे ऑक्टोबरमध्ये सुरू झाला. यात ओल्या दुष्काळासंबंधीच्या सवलती, आदेश शासनाने लागू केलेल्या असताना देखील बँकांची पीककर्ज वसुली सुरूच असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांत आहेत.
राष्ट्रीयीकृत बँका मनमानी करीत आहेत. सुरुवातीपासून या बँका पीककर्ज वाटपात हात आखडता घेत आहेत. शेतकरी नव्या पीककर्जाचे प्रस्ताव घेवून बँकेत जात आहेत. परंतु बँका शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत.
जळगाव जिल्ह्यात सुमारे ५० कोटी रुपये पीक कर्ज वितरण झाले आहे. धुळे व नंदुरबारातही प्रत्येकी २० कोटींवर पीक कर्ज वितरण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वितरण ऑक्टोबरच्या महिन्यातच सुरू झाल्याची माहिती मिळाली. यातच जशी वसुली होईल, तसे पीक कर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बँका करतील. वसुली सुरू आहे. वसुलीनंतर लागलीच पीक कर्ज नूतनीकरण केले जाते. पण जे शेतकरी पीक कर्ज भरू शकत नाहीत, त्यांना बँका नोटिसा देणे, तोंडी सूचना देऊन पीककर्ज मागत आहेत.
--- चौकट ----
थकबाकीदार, कर्जदार शेतकरी अनेक
अनेक शेतकरी जळगाव जिल्ह्यात थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडून पीककर्ज वसुलीचा तगादा बँका मार्च महिन्यापासून लावत आहेत. काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज यंदा थकल्याने नवे कर्ज मिळू शकत नाही.
---- चौकट -----
पीककर्ज वितरण रखडत
जळगाव जिल्ह्यात सुमारे ९०० कोटी, धुळ्यात १५० आणि नंदुरबारात ११० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. गेल्या वर्षीदेखील पीक कर्ज फक्त ६० टक्केच वितरित झाले होते. शासन किंवा प्रशासन पीककर्ज वितरण लक्ष्यांक निश्चित करते, परंतु बँकांना पीककर्ज निधीची व्यवस्था करावी लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.