पुणे

कळस येथील वितरिकेचे काम निकृष्ट

CD

कळस, ता. ४ : इंदापूर तालुक्यातील कळस येथील खडकवासला कालव्यावरील ४८ क्रमांकाच्या वितरिकेचे होणारे निकृष्ट दर्जाचे काम तत्काळ थांबवून, संबंधित ठेकेदाराला अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार काम करण्याच्या सूचना देण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे केली आहे.
भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश खारतोडे, बाळासाहेब भांडवलकर, नंदकुमार पवार यांसह अन्य लाभार्थी शेतकऱ्यांनी, ४८ क्रमांकाच्या वितरिकेच्या दुरुस्ती कामात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप केला आहे. हे काम अंदाजपत्रकानुसार आणि गुणवत्तेप्रमाणे चाललेले नाही. कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या अस्तरीकरणाची जाडी कमी आहे. शिवाय अस्तरीकरणासाठी मशिनचा वापर होणे गरजेचा असताना, केवळ लाकडी फळीच्या साह्याने अस्तरीकरण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अस्तरीकरणापूर्वी करण्यात येणाऱ्या मुरमीकरणावर पाणी मारले जात नाही. अस्तरीकरण झालेल्या ठिकाणी तडे गेले आहेत. एकंदरीत हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. कामाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ठेकेदाराने धमकावल्याचेही समोर आले असून, ठेकेदारावर कारवाई न झाल्यास मंजूर झालेल्या ९.७७ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान निवेदनाच्या प्रति कृषिमंत्री, जलसंपदामंत्री, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनाही देण्यात आल्याचे रमेश खारतोडे यांनी सांगितले.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT