कुडीत्रे येथे खरीप
पूर्व आढावा सभा
कोल्हापूर : आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कुडीत्रे (ता.करवीर) खरीप हंगामपूर्व आढावा सभा व शेतकरी मेळावा पार पडला.
कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य इंद्रजीत पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, वनिता भोगम आणि उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
डॉ. शांतीकुमार पाटील यांनी ‘एकात्मिक पीक पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. अभय बागडे यांनी ऊस व इतर पिकांवरील ‘हुमणी कीड व्यवस्थापन’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले, मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र माने यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.