पुणे

खताचे योग्य वापर करा

CD

खरीप हंगामात योग्य खत व्यवस्थापनाने वाढेल उत्पादकता
--
भेसळयुक्त खतांपासून दूर राहा ः कृषी विभागाचे आवाहन
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : खरीप हंगामाला सुरुवात होताच रासायनिक खतांची मागणी वाढली असून डीएपी खताचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा संतुलित वापर करावा, असे आवाहन भिवापूर तालुका कृषी विभागाने केले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, डीएपी हे नत्र (एन) व स्फुरद (पी) यांचा महत्त्वाचा स्रोत असले तरी सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी), ट्रिपल सुपर फॉस्फेट (टीएसपी), १०:२६:२६, १२:३२:१६, १५:१५:१५ आणि २०:२०:०:१३ यांसारखी संयुक्त खते प्रभावी पर्याय ठरू शकतात. या खतांच्या वापरातून पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो.
मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होते. तसेच शेतकऱ्यांनी खते केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करून पक्के बिल घ्यावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
रासायनिक खतांसोबत शेणखत, गांडूळखत व जैविक खतांचा वापर वाढविल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. खतटंचाईमुळे घाबरून न जाता कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन भिवापूर तालुका कृषी अधिकारी सुप्रिया कोकणी यांनी केले आहे.

कोट -
डीएपी खताचा पुरवठा मर्यादित असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मृदा परीक्षणाच्या आधारे आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी खतांचा वापर केल्यास उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
- सुप्रिया कोकणी, तालुका कृषी अधिकारी, भिवापूर.

चौकट --
भेसळयुक्त खतांपासून सावध
खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, पक्के बिल घ्यावे आणि संशयास्पद खते आढळल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT