पुणे

खटावमध्ये वाहतूक नियमभंगावर पोलिसांची कारवाई; नागरिकांकडून समाधान

CD

खटावमध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई

नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल; रोडरोमिओंवरही करडी नजर

खटाव, ता. ४ : येथे वारंवार वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर पुसेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
गावातील मुख्य रस्त्यावर ‘नो पार्किंग’ झोनमध्ये उभ्या केलेल्या वाहनांमुळे तसेच रोडरोमिओंच्या वर्दळीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासून विशेष तपासणी मोहीम हाती घेत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
कारवाईत वाहतूक पोलिस कर्मचारी संतोष बागल, बापूराव नवत्रे, सार्जंट बकरे तसेच तोडकर यांनी सहभाग घेतला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड ठोठावण्यात आला असून, भविष्यातही अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, गावातील नागरिकांच्या वतीने या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. पोलिसांनी वेळोवेळी अशी मोहीम राबविल्यास गावातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरळीत राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे, तसेच सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------
01362
खटाव : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करताना पुसेगाव पोलिस. (राजेंद्र शिंदे : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मधून निवृत्ती ? ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT