Shivsena Media Gallery
पुणे

खेड : शिवसेनेच्या सदस्यांना ‘व्हीप'

पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी पक्षादेश (व्हीप) बजावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राजगुरुनगर : उच्च न्यायालयाच्या (high court) आदेशानुसार खेड (khed) पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावावर बुधवारी (ता. १८) दुसऱ्यांदा मतदान होणार आहे. या अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी शिवसेनेच्या (shivsena) आठ पंचायत समिती सदस्यांना पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी पक्षादेश (व्हीप) बजावला आहे.

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ३१ मे रोजी ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाला होता. त्याबाबतच्या आव्हान याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने अविश्वास ठराव रद्दबातल ठरवून जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश २७ जुलै रोजी दिले होते. त्यानुसार १८ ऑगस्ट रोजी मतदान घेण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी लावला आहे.

या अविश्वास ठरावाच्या कार्यवाहीसाठी उपस्थित राहण्याच्या नोटीस सर्व १४ पंचायत समिती सदस्यांना बजावलेल्या आहेत. अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या ६ सदस्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ जून रोजी दाखल केलेला आहे. त्याच्यावर १७ ऑगस्ट रोजी सुनावणी आहे. आता पुन्हा ठरावावर मतदान केल्यास पक्षांतरविरोधी कायद्यानुसार, अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार या सदस्यांवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT