पुणे

वाडा- टोकावडे रस्त्याची दुरवस्था

CD

चास, ता. १३ : खेड तालुक्यातील वाडा- शिरगाव- टोकावडे या वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी मंजूर झालेला साडेतीन कोटींचा निधी खर्च होऊनही रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील हा मार्ग भीमाशंकर देवस्थान आणि सह्याद्रीच्या पर्यटन स्थळांना जोडणारा मुख्य दुवा आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, खेड तालुक्यातील काम अर्धवट सोडून आंबेगाव तालुक्यातील कामाला प्राधान्य देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या रस्त्यावर प्रचंड धूळ आणि खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका पर्यटनावर आधारित आदिवासींच्या रोजगारालाही बसत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हा मार्ग आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, आमचे आर्थिक गणित या रस्त्यावर अवलंबून आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पर्यटनावर विपरीत परिणाम होणार असून, आम्हाला राष्ट्रीय महामार्ग यांच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.
-समीर सुपे, जिल्हा परिषद सदस्य

खड्डे भरण्याबाबत निविदा झाली असून, एक ते दोन दिवसात खड्डे भरण्यास सुरुवात होईल. तसेच महामार्गाचेही काम सुरू होणार आहे.
-श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

04510

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test, Day-3: श्रीलंकेने फॉलो-ऑन टाळला, पण भारताला मिळाली मोठी आघाडी! सोनल दिनुशा शतक करत चकमकला

BMC: शुद्ध हवेसाठी हायपरलोकल सेन्सर्स, प्रदूषणावर मात करण्यासाठी महापालिकेचा नवा प्लॅन

Marathi News Live Updates : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पीडित व्यक्तीकडून १६ लाख रुपये उकळले

Ramp AI Index: नामांकित कंपन्यांमध्ये AI चा अतिवापर? ६ महिन्यांत खर्च तिप्पट; एका कर्मचाऱ्यामागे मोजावे लागतात ७ लाख?

Ravindra Jadeja Milestone: रवींद्र जडेजा कपिल देवनंतर 'असा' पराक्रम करणारा दुसराच भारतीय! जगातील चार दिग्गज ऑलराऊंडरमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT