पुणे

जलसंधारणाच्या कामांमुळे शेतीला लाभ : कुमार

CD

दावडी, ता. ३० : ‘‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत खेड तालुक्यात राबविण्यात आलेल्या पाणलोट विकासाच्या कामांमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्याची उपलब्धता सुधारून शेतीला त्याचा लाभ होत आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी आणि झालेली कामे समाधानकारक असून प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेबद्दल समाधानी आहे,’’ अशी माहिती केंद्रीय भूमी संसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार यांनी दिली.

पाणलोट विकासा प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविण्याच्या उपाययोजनांमुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीला नवी उभारी मिळाली आहे. भूजल पातळीत सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना पूर्वी दोन पिकांऐवजी आता तीन पिके घेणे शक्य होत आहे. या कामांची शुक्रवारी (ता. ३०) कुमार यांनी पाहणी केली.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत खेड तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणलोट विकास प्रकल्प राबविण्यात आला. सन २०२१ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाला. यासाठी केंद्र सरकारकडून ७०७.४३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी ६८४.५६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
वाफगाव, चिंचबाईवाडी, जऊळके बुद्रुक, गुळाणी, वाकळवाडी, गोसासी, पूर, कनेरसर, वरुडे, चौधरवाडी आणि गाडकवाडी या गावांमध्ये पाणलोट विकासाची विविध कामे करण्यात आली. यामध्ये पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत पाणी मुरविणे, मृदसंधारण आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्यामुळे भूजल पातळीत सुधारणा होण्याबरोबरच शेतीसाठी संरक्षित पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आढावा
केंद्रीय सचिव दिलीप कुमार यांनी वरुडे, गुळाणी, वाफगाव आणि कनेरसर येथील पाणलोट विकासाच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर वाफगाव येथील श्रीराम मंदिरात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. त्यांनी जलसंधारणाच्या कामांमुळे शेतकऱ्यांना झालेला फायदा आणि प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त केले.

भूजल पातळीतील वाढीचे मोजमाप भूजल विभागामार्फत करण्यात येत आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने पूर्वी मर्यादित क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अधिक क्षेत्रावर लागवड करणे शक्य होत आहे. परिणामी शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पाहणी दौऱ्यात केंद्रीय भूमी संसाधन विभागाचे सहसचिव नितीन खाडे, राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, प्रादेशिक जिल्हा जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, कार्यकारी अभियंता कपिल बिडगर, प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणेचे तथा तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अभियंते, उमेद संस्थेचे अधिकारी-कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

पाणलोट विकासाच्या कामांमुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. पूर्वी पाण्याअभावी शेतीला मर्यादा येत होत्या. मात्र, आता विहिरींच्या, तलावांच्या पाणीपातळीत सुधारणा झाल्याने शेतीसाठी संरक्षित पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे दोन पिकांऐवजी तीन पिके घेणे शक्य झाले आहे. शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यासही या प्रकल्पाची मदत झाली आहे.
- रूपेश रामाने,
शेतकरी, वाफगाव (ता.खेड)

00705

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Census 2027: मोठी बातमी! जनगणनेच्या वेळापत्रकाची घोषणा; 'या' तारखांना होणार सर्वेक्षण, काही भाग तात्पुरते वगळले; 'हे' प्रश्न विचारले जाणार

FDA Action : कालबाह्य अन्नपदार्थांची तारखांमध्‍ये छेडछाड करून पुनर्विक्री; एफडीएकडून नवीन राज्यस्तरीय आदेश लागू

Marathi News Live Updates : लासलगाव परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; एकाएकी मुसळधार बरसल्याने नागरिकांची तारांबळ!

Offline Admission : ‘ऑफलाइन’ प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना दंड, विद्यार्थ्यांना दिलासा

Container Accident : शिवना नदीच्या पुलावर कंटेनरची ट्रकला जोरदार धडक; चालक गंभीर जखमी! पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT