Kid kidnapped from Pune station accused arrested pune police crime esakal
पुणे

Pune News : पुणे स्टेशनवरुन मुलाला पळविणाऱ्यास अटक

पोलिसांनी आरोपीला गुलबर्गा येथून अटक करून मुलाला ताब्यात घेतले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दारूच्या नशेत असलेल्या महिलेला चुकवून एकाने तिच्या सहा वर्षांच्या मुलाला पळवून नेल्याची घटना पुणे स्टेशन येथे घडली. पोलिसांनी आरोपीला गुलबर्गा येथून अटक करून मुलाला ताब्यात घेतले आहे.

इक्बाल हसन शेख (वय ३२, रा. पेडगाव, जि. कोल्हापूर, सध्या रा. गुलबर्गा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पिंपरी येथील असून, तिला दारूचे व्यसन आहे.

ती तिच्या मुलासह ९ जानेवारीला पुणे स्टेशन येथे आली होती. तेथे तिने इक्बाल शेख याच्यासोबत दारु पिली. नशेत झोपी गेल्यानंतर आरोपी शेख हा तिच्या मुलाला घेऊन पसार झाला. महिलेला पहाटे जाग आल्यानंतर तिला मुलगा सोबत नसल्याचे लक्षात आले. या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तसेच, तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेतला तेव्हा आरोपीने मुलाला गुलबर्गा येथे नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक करुन मुलाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार मार्च-एप्रिलचा हप्ता? महत्त्वाची अपडेट समोर...

Communist Politics Crisis : बंगाल, त्रिपुरापाठोपाठ आता केरळही हातातून निसटलं? भारतीय राजकारणातून डाव्यांचा 'द एन्ड'? 50 वर्षांत CPI (M) च्या घसरणीची धक्कादायक कहाणी

Assembly election results 2026 Live Update : तमिळनाडूत सत्तेचा मोठा भूकंप? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यासह ३१ मंत्री पिछाडीवर धक्कादायक चित्र समोर

Baramati election result : बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी; अजित पवारांचा २०१९ चा रेकॉर्ड मोडला

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

SCROLL FOR NEXT