Kidnapped and Molested a Daughter of Police man by Giving drugs for unconscious at pune 
पुणे

पोलिसाच्या मुलीचे अपहरण करुन गुंगीचे औषध देत केला बलात्कार; एकास अटक 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कार शिकविण्याच्या बहाण्याने तरुणीचे अपहरण करुन तिला लुबाडण्याचा प्रकार काही दिवसांपुर्वीच शहरात घडला असतानाच, आता पोलिसाच्या मुलीचे तिच्या मित्रासह तिघांनी अपहरण करुन तिला नगरमधील नेवासा येथे नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सोमवारी रात्री आठ वाजता तरुणीचे वडगाव शेरी परिसरातून अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आला असून एकास अटक करण्यात आली आहे. पोलिसाच्याच मुलीवर हा प्रसंग ओढावल्याने सर्वसामान्य नागरीकांची काय स्थिती असेल, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सागर मोहन सातव ( वय 28, रा.सातव वस्ती, वाघोली) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हास दाखल झाला असून सातव यास अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील पोलिस शिपाई आहेत. तरुणीची ते राहात असलेल्या परिसरातील एका तरुणाशी मैत्री होती. दरम्यान, संबंधीत तरुणी ही 21 डिसेंबरला रात्री आठ वाजता वडगाव शेरी येथून रस्त्याने एकटी जात होती. त्यावेळी सागर व त्याचे दोन साथीदार कारमधून तिच्याजवळ आले.

सागरने तरुणीला अडवून "मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बसली नाही तर मी जीवाचे बरेवाईट करून घेईल.' अशी धमकी देत त्याच्याकडे असलेली विषारी औषधाची बाटली तरुणीला दाखविली. या प्रकारामुळे घाबरलेली तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर त्यांनी तरुणीला गाडीमध्येच गुंगीचे औषध दिले. त्यामुळे तरुणी अर्धवट बेशुद्ध झाली. त्यानंतर त्यांनी तिचे हातपाय बांधून तिला नगरमधील नेवासा येथे नेले. तेथे त्यांनी तरुणीवर बलात्कार केला. या प्रकारानंतर तरुणीला त्यांच्या कारमधून पुन्हा पुण्यात आणून सोडले. घडलेल्या प्रकारामुळे तरुणीला धक्का बसला, मात्र तिने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास चंदन नगर पोलिस करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT