मंचर, ता. ७ : पेठ (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध खाद्यपदार्थ व भाजीपाल्याच्या स्टॉल्सवर पालक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या मेळाव्यात पन्नास हजार रुपयांहून अधिकची आर्थिक उलाढाल झाली.
मेळाव्यात ‘खाऊ गल्ली’ आणि ‘भाजी गल्ली’ अशी आकर्षक मांडणी करण्यात आली होती. ‘खाऊ गल्ली’मध्ये जिलेबी, भजी, बटाटेवडा, इडली, डोसा, पाणीपुरी, समोसे, पॅटिस आदी खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. तर ‘भाजी गल्ली’मध्ये शेवगा, बटाटा, कांदा, पालक, चिंच, लिंबू, कांदापात, कारली आदी ताज्या भाज्यांचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी उभारले होते.
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन आणि उद्योजकतेची प्राथमिक ओळख व्हावी, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केले होते. बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक राक्षे यांच्या हस्ते झाले. या वेळी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन रघुनाथ तोडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष धुमाळ, मुख्याध्यापिका इंदू नाचर, स्वामी ढमाले, किरण गुंजाळ, गणेश राजगुरू यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संगीता शेटे, अलका मगर, योगिता बुट्टे, वैशाली बढे, नयना चौधरी, सुजाता थोरात व रुपाली होनराव या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.