पुणे

किन्हीराजा दत्तक गाव सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल ठरणार –जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचा विश्वास

CD

किन्हीराजा दत्तक गाव
विकासाचे आदर्श मॉडेल ठरणार

जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचा विश्वास

वाशीम ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत दत्तक घेतलेल्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गावाचा सर्वांगीण विकास वेगाने सुरू असून हे गाव जिल्ह्यासाठी आदर्श मॉडेल ठरू शकते, असा विश्वास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केला.
किन्हीराजा येथे विविध विभागांच्या समन्वयातून जलसंधारण, कृषी, पशुसंवर्धन, पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा विकासाला गती मिळत आहे. जलसंधारण विभागाकडून तलाव दुरुस्ती, नाल्यांचे खोलीकरण तसेच पाणी साठवण क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमांत नाम फाउंडेशनचे सहकार्य मिळत आहे.
कृषी क्षेत्रात शेततळे, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून ‘पशु संजीवनी’ शिबिरे, लसीकरण मोहीम आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
पर्यटन विकासासाठी कारेपूर्णा अभयारण्य परिसरात पर्यटन आराखडा तयार करण्यात येत असून पांडवलेणी टेकडी, महादेव कुंड येथे विकासकामांना गती देण्यात आली आहे. झिपलाईन आणि वाहनतळ यांसारखे उपक्रमही प्रस्तावित आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी उमेद अभियान अंतर्गत बचत गटांना पापड, मसाला, शिवणकाम, ब्युटी पार्लर यांसारख्या उद्योगांचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत आहे.
एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून वृक्षलागवड व बांबू लागवडीचे उपक्रमही सुरू आहेत. मनरेगाअंतर्गत कामांचे ई-नोंदणीकरण व पोर्टलवरील अपलोडिंग वेगाने सुरू आहे.
क्रीडा, शिक्षण, समाजकल्याण, मत्स्यव्यवसाय आणि कामगार विभागही सक्रियपणे विविध योजना राबवत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांचे समन्वित प्रयत्न सुरू असून किन्हीराजा गाव लवकरच आदर्श विकास मॉडेल म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT