सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ५ : भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर-आयएआरआय) आनुवंशिकी विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किरण बापूसाहेब गायकवाड यांची लंडन येथील प्रतिष्ठित ‘द लिनियन सोसायटी ऑफ लंडन’ या संस्थेच्या फेलोशिपसाठी निवड झाली आहे. वनस्पती आनुवंशिकी, पीक उत्क्रांती, गव्हाच्या सुधारित जाती, जैवविविधतेचे संवर्धन आणि आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीयपातळीवर दखल दखल घेण्यात आली आहे.
या फेलोशिपमुळे त्यांना नावापुढे ‘एफएलएस’ ही मानद पदवी लावण्याचा अधिकारही मिळणार आहे. ‘लिनियन सोसायटी’ ही १७८८ मध्ये स्थापन झालेली जैविक शास्त्राच्या अभ्यासासाठी समर्पित वैज्ञानिक संस्था आहे. प्रसिद्ध स्वीडिश शास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांच्या नावावरून नामकरण झालेल्या या संस्थेचा संबंध उत्क्रांतिवादाचे जनक चार्ल्स डार्विन आणि अल्फ्रेड रसेल वॉलेस यांच्या उत्क्रांतीविषयक संशोधनाच्या ऐतिहासिक सादरीकरणाशीही आहे. डॉ. गायकवाड यांनी प्राचीन कृषी वारशाचा भाग असलेल्या ‘इंडियन डॉर्फ व्हिट’ (Triticum sphaerococcum) या गव्हाच्या प्रजातीचा सखोल अभ्यास केला आहे. या प्रजातीचे त्यांच्या देखरेखीखाली जगातील एकाच ठिकाणी जतन करण्यात आलेले सर्वांत मोठे जनुकीय संसाधन संकलन उपलब्ध आहे. ‘जनुकीय विश्लेषण’, ‘आण्विक प्रजनन’ आणि ‘फेनोमिक्स’ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोषणसमृद्ध तसेच हवामान बदलाला तोंड देऊ शकणाऱ्या गव्हाच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी उपयुक्त जनुकीय घटक त्यांनी शोधले आहेत.
....
संशोधन नेमके काय?
मागील पंधरा वर्षांच्या संशोधन कारकिर्दीत डॉ. गायकवाड यांनी गव्हाच्या दहा जाती विकसित केल्या असून देशातील विविध कृषी हवामान विभागांसाठी ३२ जातींच्या विकासात योगदान दिले आहे. त्यांच्या संशोधनावर आधारित पन्नासहून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
आतापर्यंतचे सन्मान
‘व्हिट इनिशिएटिव्ह’अंतर्गत गव्हातील अजैविक ताण सहनशीलतेसाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ कार्यगटाचे ते सह-अध्यक्ष आहेत. त्यांना ऑस्ट्रेलिया पुरस्कार फेलोशिप, भारतीय आनुवंशिकी व वनस्पती प्रजनन संस्थेची फेलोशिप आणि केंद्र सरकारचा ‘नानाजी देशमुख आयसीएआर पुरस्कार’ मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.