pune sakal
पुणे

किरण गोसावी युपीत येणार शरण, पोलिसांनी नाकारली परवानगी

महाराष्ट्र ऐवजी उत्तर प्रदेश पोलिसांकडे गोसावी येणार शरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंमली पदार्थ प्रकरणी 'एनसीबी'ने ताब्यात घेतलेल्या आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारा तसेच त्याच्यासमवेत सेल्फी घेणाऱ्या किरण गोसावी याच्या मागावर पुणे पोलिसांची पथके आहे. दरम्यान, गोसावी याने सोमवारी प्रसाधमाध्यमांशी संपर्क साधून आपण उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे स्पष्ट केले. पण उत्तर प्रदेशातील माडियाव पोलिसांनी त्याला शरण येण्यास परवानगी नाकारल्याचं सुत्रांनी सांगितलं. गोसावीविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास "एनसीबी'च्या पथकाने काही दिवसांपुर्वी मुंबईत एका क्रुझवरुन ताब्यात घेतले होते. त्यास संबंधीत प्रकरणामध्ये पंच म्हणून काम पाहिलेल्या किरण गोसावी याने "एनसीबी'च्या कार्यालयात आणले. त्यानंतर त्याच्यासमवेत काढलेले छायाचित्र समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणावर व "एनसीबी'चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टिका करण्यास सुरूवात झाली. मलिक यांनीच सेल्फी घेणाऱ्या गोसावीचे बिंग फोडले.

दरम्यान, गोसावी हा फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पुणे पोलिसांनीही गोसावीचा शोध घेण्यास सुरूवात केली. फरासखाना पोलिस व गुन्हे शाखेची पथके सध्या गोसावीच्या मागावर आहेत. दरम्यान, सोमवारी सायंकाळी गोसावीने प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून आपण उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे स्पष्ट केले. गोसावी कोठे आहे, त्याने कोठून वृत्तवाहिन्यांशी संपर्क साधत आहे, याचा तपास पुणे पोलिस करीत असल्याचे फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोयेकर यांनी सांगितले. तर गोसावीचा शोध आम्ही घेत आहोत, मात्र अद्याप कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले.

"के.पी. गोसावीविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फरासखाना पोलिस व गुन्हे शाखेची पथके त्याचा शोध घेत आहेत. पुणे पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे,'' अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT