kiran Gosavi Sakal
पुणे

किरण गोसावीची दुसऱ्या दिवशीही पुणे पोलिसांना हुलकावणी

पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगत दिला गुंगारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्यन खान प्रकरणी चर्चेत आलेला आणि पुणे पोलिसांनी फरारी घोषीत केलेला संशयित आरोपी किरण गोसावी याने सलग दुसऱ्या दिवशीही पुणे पोलिसांना हुलकावणी दिली. गबुधवारी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती गोसावीने पसरविली. त्यादृष्टीने पोलिसांनीही तयारी केली, मात्र रात्री उशीरापर्यंत गोसावी पोलिसांच्या हाती लागला नाही.

अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटीक्‍स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ताब्यात घेतलेल्या आर्यन खानला "एनसीबी'चा पंच म्हणून त्यांच्या कार्यालयात आणणारा व त्याच्यासमवेत सेल्फी घेतल्यामुमे गोसावी काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यानंतर गोसावीच्या अंगरक्षकाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यापासून गोसावी बेपत्ता होता. दरम्यान, त्याने सोमवारी वृत्तवाहिन्यांशी फोनद्वारे संपर्क साधून आपण महाराष्ट्र पोलिसांऐवजी उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यामुळे अगोदरच गोसावीच्या मागावर असलेल्या पुणे पोलिसांनी तत्काळ उत्तर प्रदेशमधील लखनौ गाठले. गोसावीचा शोध घेत पोलिस उत्तर प्रदेशातील माडीओ पोलिस ठाण्याच्या परिसरात पोचले. मात्र गोसावीला पोलिसांची कुणकूण लागली त्यानंतर तो तेथून पसार झाला. त्यानंतर गुरूवारी गोसावीने तो पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची बातमी पसरविली. त्यामुळे पुणे पोलिस दिवसभर गोसावीला अटक करण्याच्या तयारीत होते. मात्र रात्री उशीरापर्यंत गोसावी पुण्यात आला नाही. गोसावी विरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात पोलिसांनी त्यास फरारी घोषीत केला आहे. त्यामुळे फरासखाना पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर आहेत. त्याचबरोबर मुंबई पोलिसही गोसावीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

"" फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावी खोटे बोलुन पोलिसांची दिशाभुल करण्याचे काम करीत आहे. मात्र त्याला लवकरच अटक केले जाईल.''

अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

Pachod Accident : हळदीचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या मावसभावाचा दूचाकी धडकून मृत्यू

Marriage Rules: महाराष्ट्रात लग्नाचे नियम बदलणार! लग्नपत्रिकेत वर-वधुची जन्मतारीख बंधनकारक होणार? बालहक्क आयोगाची मोठी शिफारस

SCROLL FOR NEXT