पुणे

आयएफएस प्रशिक्षणात मिळविली तीन पदके

पांडुरंग सरोदे

पुणे - वडील वाहतूक शाखेत सहायक पोलिस उपनिरीक्षक, तर आई गृहिणी. अभ्यासात चांगली गती असलेल्या त्यांच्या मुलाने दहावी, बारावी, पदवी अभ्यासक्रमात आपली चुणूक दाखविली. पुढे त्याच मुलाने अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. भारतीय वन सेवेच्या (आयएफएस) परीक्षेत तो केवळ चमकलाच नाही, तर त्याने प्रशिक्षणाच्या कालावधीत तीन पदके मिळवून स्वप्न सत्यात उतरविले. या ‘आयएफएस’ झालेल्या मुलाचे नाव आहे, किरण सुरेश जगताप!

नोकरीत कामाचा ताण असूनही मुलांना चांगले शिक्षण मिळावे, ही सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश जगताप यांची धडपड होती. त्यांच्या पत्नी कमल यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत मुलगा किरण व मुलगी नेहा यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले. किरण हे दहावी-बारावीत गुणवत्ता यादीत आल्यानंतर त्यांनी कृषी विषयात बी.एस्सी पूर्ण केले. त्यानंतर ते दोन वर्षे दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी गेले. सुरवातीला त्यांची सहायक भविष्य निर्वाह निधी आयुक्त म्हणून राजस्थानमध्ये नियुक्ती झाली. नंतर २०१७ मध्ये किरण आयएफएस ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांचे हैदराबाद आणि डेहराडून येथे प्रशिक्षण झाले.    
किरण यांनी ‘आयएफएस’च्या प्रशिक्षणामध्ये सर्वाधिक गुणांसाठीचे पदक, जैवविविधता संवर्धन पदक आणि वन्यजीव व्यवस्थापन पदक अशी तीन पदके मिळविली. भारतीय वन सेवा अधिकारी म्हणून महाराष्ट्रात नियुक्ती झालेल्या किरण यांचा ३० एप्रिलला तिन्ही पदके देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

आई-वडिलांकडून शिक्षणास प्रोत्साहन मिळाले. भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणाऱ्या भारतीय वन सेवेची परीक्षा दिली. मराठी मुले या परीक्षेत आता मोठ्या संख्येने येत आहेत. 
- किरण जगताप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT