kirit somaiya 
पुणे

सोमय्या दोन तास पोलीस ठाण्यात बसले, शेवटी गुन्हा दाखल नाहीच

सकाळ डिजिटल टीम

किरीट सोमय्या जंबो कोविड रुग्णालयाचा घोटाळा काढण्यासाठी पुणे महानगपालिकेत गेल्यानंतर त्यांना आक्रमक शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. यामध्ये सोमय्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. (Kirit Somaiya in PMC)

हे प्रकरण झाल्यानंतर राज्यात पुन्हा शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यानंतर सोमय्यांना दुखापत झालेल्या पायऱ्यांवरच त्यांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर सोमय्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे खासदार गिरीष बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.

सोमय्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. या दरम्यान सोमय्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. आपल्या तक्रारीनुसारच शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्या इच्छूक होते. त्यासाठी रात्रीपर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते बसले.

मात्र, दोन तास बसल्यानंतरही त्यांचा गुन्हा नोंदवून घेण्यात आला नाही. त्याऐवजी पोलिसांनी सुरुवातीला दाखल झालेल्या गुन्ह्यात सोमय्यांचा जबाब नोंदवला आणि प्रकरणार पडदा पडला.

हे झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सोम्य्यांनी केला आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT