Kirit Somaiya Sakal
पुणे

Kirit Somaiya: शिवाजीनगर पोलिसांनी नोंदवला सोमय्यांचा जबाब

सोमय्या पाच फेब्रुवारीला पुणे महापालिकेत आले असताना त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : माजी खासदार व भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरील महापालिका आवारातील हल्ला प्रकरणात शुक्रवारी रात्री शिवाजीनगर पोलिसांनी सोमय्या यांचा जबाब नोंदविण्यात आला. याबाबत सोमय्या यांनी पोलीसांनी आपल्याला दोन तास बसवून हल्लेखोराविरुद्ध गुन्हा न नोंदविता केवळ जबाब नोंदविला." अशा शब्दात पुणे पोलिसांवर टिका केली.

शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराबाबत तक्रार देण्यासाठी सोमय्या पाच फेब्रुवारीला पुणे महापालिकेत आले असताना त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. दरम्यान, या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी ९ जणांना अटक केली होती.

दरम्यान, संबंधित प्रकरणात आपल्या तक्रारीनुसार हल्लेखोरांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सोमय्या शुक्रवारी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले होते. त्यानुसार, शिवाजीनगर पोलिसांनी पहिल्याच गुन्ह्यात सोमय्या यांचा जबाब नोंदविला.

याबाबत सोमय्या म्हणाले, "शिवाजीनगर पोलिसांनी मला दोन तास बसवून ठेवून केवळ जबाब नोंदविला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर राज्य सरकारचा दबाब आहे. सुरक्षारक्षकांवर हल्ला होऊनही त्यांचाही गुन्हा दाखल केला नाही. सर्व पुरावे देऊनही पोलिस कारवाई करीत नाहीत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT