maharashtra police sakal
पुणे

सोमय्यांच्या दौऱ्याची माहिती न मिळविल्यामुळे दोन पोलिस निलंबीत

परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे दौरा व महापालिका भेटीची माहिती न मिळविल्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याच्या प्रकरणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अखेर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाईचा बडगा उगारला आहे. (Two Police Rusticates While Kirit Somaiya In Pune )

दिलीप गोरे व सतीश कुंभार असे निलंबन केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गोपनीय शाखेत (एलआयबी) नेमणुकीला आहेत. भाजप नेते सोमय्या यांचा 5 फेब्रुवारी रोजी पुणे दौरा होता. त्याचवेळी ते महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने सोमय्या जखमी झाले होते. या प्रकरणाची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह केंद्रीय गृहमंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाची कारणे शोधण्यास सुरूवात केली.

सोमय्या यांचा 5 फेब्रुवारी रोजी पुणे दौरा असतानाही गोरे व कुंभार या पोलिस कर्मचाऱ्यांना त्यासंबंधिची माहिती मिळाली नाही. त्यानंतर पुढे संबंधित प्रकार घडला. त्यांनी कामात कुचराई केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे संबंधित पोलिसांचे निलंबन करण्यात आले असल्याचे परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांच्या आदेशामध्ये नमूद केले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काही दिवसांपुर्वी झालेल्या दौऱ्यासंबंधी काढण्या आलेल्या दुचाकी फेरीचीही माहिती संबंधित पोलिसांना मिळाली नव्हती. त्यानंतर सोमय्या यांच्यासंबंधीही हाच प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT