किरकटवाडीतील नव तरुण मंडळाची स्थापना १९६७ मध्ये झाली असून, यंदा मंडळाचा ५९वा गणेशोत्सव साजरा होत आहे. स्थापनेपासूनच धार्मिक उत्सवाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने गावाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. परिसरात मंडळाचा गणपती ‘किरकटवाडीचा राजा’ या नावाने प्रसिद्ध आहे.
मंडळाचे ढोल-झांज पथक हे मंडळाची प्रमुख ओळख आहे. पारंपरिक वाद्यकलेचा वारसा जपत पथकाने मंडळाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंडळाकडून दरवर्षी साध्या पद्धतीने सजावट करून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, उत्सवापुरते कार्य मर्यादित न ठेवता मंडळाने वर्गणीतून संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा जपली आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना मदत तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. गावाच्या विकासातही मंडळाने मोलाची भूमिका बजावली आहे. गावातील पाण्याच्या टाकीसाठी निधी देणे, मराठी शाळेसाठी खोली बांधून देणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, अशा कामांत मंडळाने योगदान दिले आहे. जुन्या पिढीने जपलेला समाजसेवेचा वारसा नव्या पिढीतील कार्यकर्ते पुढे नेत आहेत.
.............
मंडळाची वैशिष्ट्ये
- चार दशकांहून अधिक काळ ढोल-झांज पथकाची परंपरा
- महाराष्ट्रासह दिल्ली व राजस्थानमध्ये पथकाची चमकदार कामगिरी
- यंदापासून डीजे मुक्त गणेशोत्सवाला सुरुवात
- दर शनिवारी नागरिकांसाठी आरोग्य शिबिर
...........
मंडळाचे कार्यकर्ते
सुयश हगवणे, सुरज हगवणे, नितीन हगवणे, संदिप हगवणे, यश हगवणे
............
शब्दांकन : नीलेश चांदगुडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.