rape case  file photo
पुणे

किरकटवाडी : डोणज्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

पोस्को अंतर्गत सलग दुसरा गुन्हा दाखल; पहिल्या गुन्ह्यातील दोघांचा या गुन्ह्यातही सहभाग

निलेश बोरुडे

किरकटवाडी : डोणजे (ता.हवेली) येथे पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांकडून सामुहिक लैंगिक अत्याचार (Rape) करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे दोनच दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींचा या गुन्ह्यातही सहभाग आहे.

निलेश नेटके (वय 21), लक्ष्मण पाटील (वय 22) व इतर तीन अल्पवयीन ( सर्व राहणार डोणजे ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून यातील निलेश नेटके हा अटक असून लक्ष्मण पाटील फरार झाला आहे. दोन दिवसांत दोन वेळा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने डोणजे परिसरातील पालक व शिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे.

हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ तयार केले. घडलेल्या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीला व तिच्या आईला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडीत मुलीने याबाबत माहिती दिली. त्यानुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम याबाबत अधिक तपास करत आहेत.

"पहिल्या पोस्कोच्या गुन्ह्यातील काही विकृत आरोपी या गंभीर गुन्ह्यातही सहभागी आहेत. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येणार असून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. असे लज्जास्पद व विकृत कृत्य यापुढे कोणी करणार नाही यासाठी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असा प्रयत्न याप्रकरणी करण्यात येणार आहे. असे काही घडत असल्यास कोणतीही भीती न बाळगता हवेली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा." सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT