Dumper sakal
पुणे

Crime News : किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर सोळा डंपरवर हवेली पोलीसांची कारवाई

पाच वर्षांनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू; सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाला जाग.

निलेश बोरुडे

किरकटवाडी - किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवण्याबाबत पाच वर्षांपूर्वी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाची अखेर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून हवेली पोलीसांनी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सोळा अवजड डंपरवर दंडात्मक कारवाई केली आहे.

अवजड वाहतुकीमुळे किरकटवाडी येथे वाहतूक कोंडी होत असल्याने सकाळ'ने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर हवेली पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

अवजड वाहतुकीमुळे किरकटवाडी गावातील मुख्य चौकात दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीमुळे पायी ये-जा करणारे विद्यार्थी व पालक, स्थानिक नागरिक, नोकरदार यांना मनःस्ताप सहन करावा लागत होता.

वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर चालण्यासाठी जागा नसल्याने लहान मुलांना अक्षरशः रस्त्याच्या कडेने असलेल्या घरांच्या समोरील ओट्यांवरुन चालावे लागत होते. विशेष म्हणजे नागरिकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून 2018 साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्यावर सकाळी 11 वाजेपर्यंत व सायंकाळी पाच नंतर अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेले आहेत.

या आदेशाच्या अंमलबजावणीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर अखेर नियम मोडणाऱ्या डंपरवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही नागरिकांची गैरसोय होत असल्याने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली होती.

चालक असतात दारुच्या नशेत

अवजड डंपर चालविणारे बहुतांश चालक हे दारुच्या नशेत असतात. अनेक चालकांकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसतो. रात्री अपरात्रीही डंपरची ये-जा सुरू असते. डंपरमुळे किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर अनेक अपघात घडलेले असल्याने पोलीसांनी डंपरचालकांची तपासणी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

'दररोज सकाळी व सायंकाळी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येत असून नियम मोडणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत सोळा डंपरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे.'

- सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

SCROLL FOR NEXT