Pune Crime Sakal
पुणे

Pune Crime : आमच्या एरियात भाजी विक्री करायची नाही म्हणत सराईत गुन्हेगारांकडून दोघांना बेदम मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; किरकटवाडी येथे चार ते पाच सराईत गुन्हेगारांनी दोघांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

निलेश बोरुडे

किरकटवाडी - आमच्या एरियात येऊन भाजी विक्री का करता असे म्हणत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे चार ते पाच सराईत गुन्हेगारांनी दोघांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर दिवसा झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हवेली पोलीसांनी सोन्या धोत्रे (वय अंदाजे 20, रा. जयप्रकाश नारायण नगर नांदेड, सिंहगड रोड), मोग्या गुंजाळ (वय अंदाजे 20, रा. जयप्रकाश नारायण नगर, नांदेड, सिंहगड रोड) आणि इतर दोन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार आहेत.

फिर्यादीतील हकीगतीनुसार दि. 11 जून रोजी कपिल रामदास नेमाडे व त्यांचे भाऊ कृष्णा नेमाडे हे टेंपो घेऊन किरकटवाडी परिसरात भाजी विक्री करत होते. त्यावेळी सोन्या धोत्रे, मोग्या गुंजाळ व इतर दोन अज्ञात साथीदारांनी भैरवनाथनगर किरकटवाडी येथे रिक्षाचा जॅक व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच नेमाडे यांच्या भाजीच्या टेंपोचीही तोडफोड केली. भर दिवसा मुख्य रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मारहाण करुन जोरजोराने शिवीगाळ करत आरोपी तेथून निघून गेले. लोखंडी जॅक चा मार लागल्याने कपिल नेमाडे काही काळ रस्त्यावर पडले होते. या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला होता. आरोपींच्या भीतीने नेमाडे तक्रार करण्यास तयार नव्हते मात्र पोलीसांनी विश्वास दिल्यानंतर दि. 15 जून रोजी त्यांनी फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक तारु याबाबत अधिक तपास करत आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती हवेली ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT