junnar.jpg
junnar.jpg 
पुणे

जुन्नर पंचायत समितीमध्ये किसान सभेने केले ठिय्या आंदोलन कारण...

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नरला किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १९)  पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुमारे साडेचार तास ठिय्या आंदोलन केले. गावागावात मनरेगाशी संबंधित प्रलंबित मागण्या व रोजगार हमीची कामे सुरू करण्याची किसान सभेची मागणी होती. मात्र, गट विकास अधिकारी यांनी निर्णय घेण्यास असमर्थता दाखवल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे किसान सभा मागणार दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी घोषणा देण्यात आल्या तसेच कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले. याबाबत गट विकास अधिकारी निर्णय घेत नाहीत. तोपर्यंत त्यांना कार्यालयातच रोखून धरण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी  घेतला. पोलिस निरीक्षक युवराज मोहिते, सभापती विशाल तांबे आदींनी हस्तक्षेप करत संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली व गट विकास अधिकारी यांना प्रश्न सोडविण्याची विनंती केली  काही मागण्या सोडवून घेण्यास संघटना यशस्वी झाली तर काही मागण्यांबाबत गट विकास अधिकारी निर्णय घेऊ शकले नाहीत.    

संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास जुन्नर पंचायत समितीला घेराव घालण्याची घोषणा करून अखेर सायंकाळी  आंदोलन मागे घेण्यात आले. किसान सभेच्या मागण्या ग्रामपंचायमध्ये काम मागणीचे अर्ज उपलब्ध  करून घ्यावेत व स्विकारले जावेत. हिवरे तर्फे मिन्हेर, सीतेवाडी, कोल्हेवाडी या ग्रामपंचायतच्या  प्रस्तावांना त्वरित प्रशासकीय मान्यता द्यावी. प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत मजुरांना कायद्याप्रमाणे बेरोजगार भत्ता द्यावा. सर्व ग्रामपंचायतीना मनरेगाचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे. शिवार भेटी आयोजित करून मनरेगाची कामे काढावीत. दर महिन्याला मनरेगा संबंधित यंत्रणेची संघटनेबरोबर  बैठक घ्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात  किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, युवा महासंघचे तालुका सचिव गणपत घोडे, संदिप रेंगडे, दीपक लाडके,  गणेश मराडे, सचिन मोरे, चेतन जोशी, खंडू मराडे, सरपंच मुकुंद घोडे, एसएफआयचे तालुका अध्यक्ष अक्षय घोडे, आरती निगळे आदींनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT