पुणे

थकीत वेतनप्रकरणी किसनवीरला तीन ऑगस्टची मुदत

CD

‘किसन वीर’ला तीन ऑगस्टची मुदत

आयुक्तांसमोर सुनावणी; कामगारांचे थकीत वेतन प्रकरण

भुईंज, ता. २४ : कारखाना कामगारांच्या कोट्यवधींच्या थकीत पगारप्रकरणी काल पुणे येथील कामगार आयुक्तांसमोर सुनावणी झाली. त्यात कारखान्याकडे थकीत वेतनासाठी विचारणा करण्यात आली. त्यावेळी कारखान्याचे प्रतिनिधी व वकिलांनी उत्तरासाठी मुदत मागितली असून, पुढील सुनावणी तीन ऑगस्टला होणार असल्याचे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बाबर यांनी सांगितले.
​किसन वीर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत पगार आणि विविध घोटाळ्यांच्या विरोधात भूमिपुत्र संघटना आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. कामगारांच्या हक्काचे पैसे लाटणाऱ्या व्यवस्थापनाला कोर्ट-कचेऱ्यांच्या पायऱ्या चढायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला आहे.
तपास अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी अदिती वालावलकर यांच्या समोर आज कामगार आयुक्त कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष श्री. बाबर यांनी कामगारांची बाजू मांडताना कारखाना प्रशासनाविरुद्ध तक्रारींचा पाढाच वाचला. थकीत पगार, रिटेन्शन भत्ता, पीएफ, एलआयसी, कामगार कल्याण मंडळ निधी घोटाळा आणि पगार फरक या सर्व मुद्द्यांवर पुराव्यांसह सविस्तर आणि आक्रमक चर्चा केली. तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा या गंभीर घोटाळ्यांवर कारखाना प्रतिनिधींना जाब विचारला, तेव्हा कारखान्याचे वकील ॲड. एम. आर. जाधव आणि लेबर ऑफिसर अरविंद शिंगटे यांनी उत्तर देण्यासाठी मुदत मागितली.
कामगारांवर होत असलेल्या अन्यायावरून तपास अधिकारी अदिती वालावलकर यांनी कारखाना प्रशासनाला आणि उपस्थित प्रतिनिधींना कडक शब्दांत जाब विचारला. ‘कामकाज अधिक जबाबदारीने आणि गांभीर्याने करा,’ असा सज्जड दम भरत व्यवस्थापनाचे कान टोचले. सामाजिक कार्यकर्ते अवधूत निकम आणि नितीन बर्गे यांचेही सहकार्य लाभले.
--------------------------------
तोपर्यंत सुधारणा करा

तपास अधिकाऱ्यांनी किसन वीर कारखाना प्रशासनाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत, की तक्रारदार श्री. बाबर आणि अवधूत निकम यांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे संचालक मंडळासमोर ठेवा आणि तीन ऑगस्टच्या पुढील बैठकीपूर्वी जास्तीतजास्त तक्रारींचे निवारण करूनच समोर या, असेही यावेळी सांगण्यात आले.
------------------------
कोट

कामगारांनी रक्ताचे पाणी करून कमावलेला पै अन् पै वसूल केल्याशिवाय भूमिपुत्र संघटना थांबणार नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे, पूर्ण न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.

- प्रवीण बाबर
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT