पुणे

लोकोपयोगी सहकारी संस्थांद्वारे किसन वीरांनी केला परिवर्तनाचा प्रयत्न

CD

किसन वीरांचा वारसा जपू

मकरंद पाटील; वाई पंचायत समितीत कार्यक्रम

वाई शहर, ता. ६ : नाना पाटील, यशवंतराव चव्हाण आदींसोबत किसन वीरांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. सहकारी, शैक्षणिक व समाजोपयोगी संस्थांची उभारणी केली. पायाभूत सुविधा निर्मितीद्वारे कृषीआधारित समाज परिवर्तनाचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांचे विचार संस्कार जपून आम्ही कार्यरत राहू, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केले.
पंचायत समिती आयोजित आबासाहेब वीर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रताप पवार, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, मोहन जाधव, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, वृषाली चव्हाण, अनुराधा कोल्हापुरे, महादेव मस्कर, विलास येवले, शशिकांत पवार, मदन भोसले, सत्यजित वीर, शंकर शिंदे, मनीष भंडारे, डॉ. जीविता जमदाडे, प्रल्हाद गाढवे, रमेश गायकवाड, कुमार जगताप उपस्थित होते.
नम्रता पोंदकुले म्हणाल्या, ‘‘समाज सुधारक, क्रांतिकारकांनी इतिहास घडविला. राजकीय नेतेमंडळी वर्तमानाची जडणघडण करतात, तर विद्यार्थी, नवी पिढी भविष्याला आकार देते.’’

कार्यक्रमात शिष्यवृत्ती, गुणवत्ताधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सदस्य शैलेश सपकाळ, राणी पवार, हर्षदा फरांदे, गटविकास अधिकारी नारायण घोलप बाळासाहेब जाधव, राहुल आदमुलवाड, हर्षवर्धन मोरे साईनाथ वाळेकर, डॉ. सुनील देशपांडे डॉ. विनय भोईटे यांनी स्वागत केले. सभापती विक्रांत डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. केशव कोदे, दीपक कासवेद यांनी सूत्रसंचालन केले. उपसभापती वर्षा जगताप यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT