किवळला महिला दिनी ग्रामस्वच्छता अभियान
‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’चा दिला संदेश; उत्स्फूर्त सहभाग
मसूर, ता. ९ : महिला दिनानिमित्त किवळमधील महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छता अभियान राबवले. स्वच्छ गाव, सुंदर गाव असा यावेळी जिल्ह्याला संदेश दिला.
महिलांच्या या उपक्रमामुळे गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. किवळ येथील माई चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, महिला बचत गट, श्री संत नवजीनाथ देवस्थान समिती, तसेच ‘आम्ही किवळकर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. अभियानात गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत महिलांनी सकाळपासून हातात झाडू, टोपल्या व स्वच्छतेची साधने घेतली. गावातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ, सार्वजनिक ठिकाणे, तसेच संत नवजीनाथ मंदिर परिसर स्वच्छ करून परिसर झाडून टाकला. ग्रामस्वच्छता अभियानानंतर संत नवजीनाथ मंदिर परिसरात महिला एकत्र जमल्या.
या वेळी माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे म्हणाल्या, ‘‘किवळच्या महिलांनी ग्रामस्वच्छता अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होत समाजाला एकतेचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे. लहान- मोठे भेद बाजूला ठेवून सर्व महिलांनी एकत्र येत केलेली ही स्वच्छता गावासाठी अभिमानास्पद आहे. किवळ गावातील महिलांनी राबवलेले हे ग्रामस्वच्छता अभियान केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता महिलांच्या सामूहिक शक्तीचे, सामाजिक बांधिलकीचे आणि गावाच्या विकासासाठी असलेल्या त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरले आहे.’’
B02567
किवळ : महिला दिनानिमित्त गावात स्वच्छता करण्यासाठी एकत्र जमलेल्या महिला.
.................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.