crime sakal
पुणे

कोंढव्यात कोयत्याने वार झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु

कोंढवा पोलिसांकडुन गुरुवारी मध्यरात्री तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : टोळक्‍याने कोयत्याने वार केलेल्या तरुणा गुरुवारी रात्री 11 वाजता ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला. दरम्यान, कोंढवा पोलिसांकडुन गुरुवारी मध्यरात्री तिघांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिक जाधव (वय 22, रा. कोंढवा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल दाखल झाला असून पोलिसांनी तिघाना अटक केली आहे. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक जाधव हा कोंढव्यातील रहिवासी असून त्याच्यावर यापुर्वीच एका व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याची यापुर्वी काही तरुणांशी भांडणे झाली होती. दरम्यान, कार्तिक हा गुरूवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात आला होता.

त्यावेळी टोळक्‍याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने उपचाराठी त्यास तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री 11 वाजता त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी प्रारंभी खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता, त्यामध्ये आता खुनाचा गुन्हा दाखल होईल, असे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT