पुणे

कोळा येथे विद्यार्थ्यावर चाकूहल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

CD

कोळा येथे विद्यार्थ्यावर चाकूहल्ला;
दोघांविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा

सांगोला, ता. २९ : कोळा (ता. सांगोला) येथील विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुभाष सदा आलदर (वय ४८, व्यवसाय शेती, रा. नाथबाबा वस्ती, कोळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा युवराज सुभाष आलदर (वय १९) हा २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी झेंडावंदन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोळा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे गेला होता. दरम्यान, दुपारी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास शंकर मारुती घाडगे (रा. कोळा) व समाधान श्रीमंत होनमाने (रा. जुनोनी) यांनी युवराज यास शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याच्या उद्देशाने सोबत आणलेल्या चाकूने पोटात भोसकून गंभीर जखमी केले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात दखलपात्र अहवाल क्रमांक ७७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पुजारी हे करत असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांनी केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT