knot of relationship love Bakula Kumhar donated kidney to her husband Deepak family life pune sakal
पुणे

Relationship : साताजन्माची गाठ किडनीदानातून विणली घट्ट

बेलवाडी येथील बकुळा कुंभार यांनी पती दीपक यांना दिली किडनी

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : असं म्हटले जाते की, लग्नाच्या रेशीम गाठी स्वर्गात बांधल्या जातात.... लग्नामध्ये सात फेरे घेऊन आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतले जाते. बेलवाडी (ता. इंदापूर) जवळील कुंभारवस्ती येथील प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या महिलेने आयुष्यभर साथ देण्यासाठी किडनी (मूत्रपिंड) दान करून पतीला जीवनदान देऊन विवाहामध्ये घेतलेल्या वचनांची पूर्तता केल्याची घटना घडली.

इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावाजवळील कुंभारवस्ती येथे दीपक कुंभार व बकुळा कुंभार हे दांपत्य राहत असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघांच्या विवाहाला १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. दीपक कुंभार हे ग्रामसेवक आहेत. तर बकुळा कुंभार या लासुर्णे जवळील टकलेवस्ती जवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आहेत.

दीपक कुंभार यांना अचानक कोरोना काळामध्ये मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे सांगितल्यानंतर कुंभार कुटुंबाला धक्का बसला. सुरवातीच्या काळामध्ये आठवड्यातून दोन-तीन वेळा डायलिसिस करण्यात येत होते. मात्र, डायलिसिसमुळे होणारा त्रास असाह्य होत असल्याने डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचविला. मात्र मूत्रपिंड कोण देणार?

असा मोठा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर पत्नी बकुळा यांनी क्षणाचा विचार न करता मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यारोपण करण्यासाठी कायदेशीररीत्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तमिळनाडूमधील कोइमतूर येथे नोव्हेंबर २०२२ रोजी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

सध्या कुंभार दोघांची प्रकृती ठणठणीत आहे. सध्याच्या काळामध्ये पती-पत्नीमध्ये वाद-विवादाच्या घटना घडत असून वाद-विवाद टोकाला जात आहेत. आधुनिक युगातील सुशिक्षित पिढीतील काही युवक-युवती लग्नानंतर काही दिवसामध्ये घटस्फोटापर्यंत टोकाचा निर्णय घेत असून त्यांच्यासाठी बकुळा व दीपकच्या आयुष्याच्या कहाणी निश्‍चित प्रेरणादायी ठरणार आहे.

दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजल्यानंतर माझ्यासह घरातील सर्वजण चिंताग्रस्त झाले होते. मात्र पत्नीने दिलेला आधार व किडनीमुळे मला जीवनदान मिळाले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी जीवनसाथी मिळाली आहे.

- दीपक कुंभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ONGC Gas Leak: आंध्र प्रदेशात ‘ONGC’ची गॅस गळती! अनेक ठिकाणी लागली आग

BJP, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी… BMC साठी २२७ वॉर्डमधील उमेदवारांची लाँग लिस्ट; कोण कुठून मैदानात? पाहा एका क्लिकवर

Mumbai News: रस्ते, कोविड, टॅब खरेदी अन्..., साडेतीन लाख कोटींचा महाघोटाळा उघड; भाजपने ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला

Baramati Protest : बारामतीत भाजप कार्यकर्त्यांचा संताप उसळला; अजित पवारांविरोधात आंदोलन!

Ichalkarnji Election : चिन्हे मिळताच उमेदवार मैदानात उतरले, पदयात्रा, कॉर्नर सभा आणि रिक्षा प्रचार; वस्त्रनगरी पूर्णपणे निवडणूकमय झाली असून प्रत्येक प्रभागात प्रचाराचा धडाका

SCROLL FOR NEXT