पुणे - गणेश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवारी आणि मंगळवारी (ता. १८-१९) शहराच्या मध्य भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौकापासून मंडईतील गोटीराम भैय्या चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीस बंद राहील.
शनिवारवाडा परिसरात भाविकांची गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी होते. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कसबा पेठेतील डेंगळे पूल ते शिवाजी पूल, कसबा पेठ पोलिस चौकीपासून जिजामाता चौक ते मंडईपर्यंत, तसेच सारसबाग परिसरातील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) या परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
वाहनतळ व्यवस्था
मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझापर्यंत
जमनालाल बजाज पुतळा ते पूरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूला
नीलायम पूल ते सिंहगड रस्ता जंक्शन
कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळादरम्यान रस्त्याच्या एका बाजूस
वीर संताजी घोरपडे पथावर मनपा बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक रस्त्याच्या दक्षिण बाजूला
टिळक पूल ते भिडे पुलादरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर
मंडई येथील मिनर्व्हा आणि आर्यन वाहनतळावर
शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक रस्त्याच्या डाव्या बाजूला
वाहतूक सुरू असलेले रस्ते
फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
मंगला चित्रपटगृहासमोरील प्रिमीयर गॅरेज लेनमधून कुंभारवेस
(या मार्गांवरून जड वाहनांना प्रवेश बंदी, इतर वाहनांची एकेरी वाहतूक)
पर्यायी मार्ग
वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे
शिवाजीनगरकडून संचेती चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे
सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली असली तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू राहील, परंतु या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत
अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी
गणेशोत्सव काळात शहरातील मध्यवर्ती भागात सोमवार (ता. १८) पासून गणेश विसर्जनापर्यंत जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौक ते टिळक चौक
केळकर रस्ता - फुटका बुरूज ते टिळक चौक
कुमठेकर रस्ता - शनिपार ते टिळक चौक
बाजीराव रस्ता - पूरम चौक ते गाडगीळ पुतळा
टिळक चौक - जेधे चौक ते टिळक चौक
शास्त्री रस्ता - सेनादत्त चौकी ते टिळक चौक
कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
फर्ग्युसन कॉलेज रस्ता - खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक
जंगली महाराज रस्ता - स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
अडीचशे बसचा मार्ग बदलणार
पीएमपी प्रशासनाने छत्रपती शिवाजी रस्त्यासह अन्य मार्गांवरील वाहतुकीत बदल केला आहे. सोमवारपासून हा बदल होईल. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपीच्या बसचा मार्ग बदलण्यात आला असून या बस टिळक रस्त्यावरून धावणार आहेत. सुमारे २५० बसचा मार्ग बदलला जाईल.
सोमवारी शिवाजी रस्त्यावरची वाहतूक वळविण्यात येईल. मंगळवारी पोलिसांच्या सूचनेनुसार आवश्यक त्या मार्गांवर बदल होतील. शिवाजी रस्त्यावरून धावणाऱ्या बस सीओईपी हॉस्टेल, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन, टिळक रस्ता आदी मार्गांवरून स्वारगेटला जातील.
असे आहेत बदल
पीएमपी बस स. गो. बर्वे चौकातून शिवाजी पुलाऐवजी जंगली महाराज रस्त्याने टिळक चौकातून स्वारगेटकडे जातील.
महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस झाशी राणी चौकातून जंगली महाराज रस्त्याने टिळक चौकातून शास्त्री रस्त्याने जातील.
अथर्वशीर्ष कार्यक्रमासाठी बदल
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने बुधवारी (ता. २०) पहाटे पाच वाजता अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित केला आहे. यात हजारो महिला भाविक सहभागी होतात. हा कार्यक्रम पहाटे सुरू होऊन तो संपेपर्यंत पुढीलप्रमाणे वाहतुकीचे नियोजन असेल.
शिवाजी रस्ता - जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक
पर्यायी मार्ग - गाडगीळ पुतळा-जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रस्त्याने फडके हौद चौक, देवजीबाबा चौकातून उजवीकडे वळून हमजेखान चौकातून सरळ महाराणा प्रताप मार्गावरुन गोविंद हलवाई चौक, उजवीकडे वळून गोटीराम भैया चौकातून डावीकडे वळून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक
पर्यायी मार्ग - अप्पा बळवंत चौकातून बाजीराव रस्त्याने फुटका बुरूजमार्गे गाडगीळ पुतळा चौकातून उजवीकडे वळून जिजामाता चौकमार्गे. लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौकापासून आवश्यकतेनुसार वाहतूक वळविली जाईल.
पर्यायी मार्ग - सोन्या मारुती चौकातून डावीकडे मिर्जा गालिब रोड जंक्शन, उजवीकडे वळून मंडईतून डावीकडे शिवाजी रस्त्याने स्वारगेट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.