पुणे

शस्त्रास्त्रांसह युद्धकौशल्याचे दर्शन

CD

मुंबईकरांनी अनुभवले लष्करी सामर्थ्य!

कुलाबा मिलिटरी स्टेशनवर ‘नो युअर आर्मी’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : अत्याधुनिक ड्रोन, मशीनगन, आधुनिक तोफा आणि रडार यंत्रणा... प्रत्यक्ष शस्त्रास्त्रे हाताळण्याची संधी आणि युद्धभूमीवरील जवानांच्या कौशल्याची प्रात्यक्षिके... अशा अनुभवातून मुंबईकरांना भारतीय सैन्याचे सामर्थ्य जवळून जाणून घेता आले. कुलाबा मिलिटरी स्टेशन येथे २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या ‘नो युअर आर्मी’ या तीन दिवसीय प्रदर्शनाला शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र योजनेतील छात्र (एनसीसी कॅडेट) व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

‘नो युअर आर्मी’ उपक्रमात अत्याधुनिक ‘ड्रोन’, आधुनिक बंदुका आणि मशीनगन यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे अभ्यागतांना काही शस्त्रास्त्रे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी देण्यात आली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या शस्त्रास्त्रांची माहिती घेतली. स्वदेशी बनावटीच्या ‘ड्रोन’चे तंत्रज्ञान आणि युद्धभूमीवरील त्यांचा वाढता वापर याविषयी जवानांनी सविस्तर माहिती दिली. आधुनिक युद्धात ‘ड्रोन’ हे केवळ टेहळणीचे साधन न राहता प्रभावी शस्त्र बनले आहे. त्यामुळे या ‘ड्रोन’च्या कार्यपद्धतीविषयी नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. हाताने वाहून नेता येणाऱ्या तोफा, आधुनिक मशीनगन, बोफोर्स तोफा आणि रडार यंत्रणा प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. या शस्त्रास्त्रांची कार्यपद्धती, क्षमता आणि युद्धातील उपयोग यांची माहिती जवानांनी दिली. ‘ड्रोन’पासून रडार यंत्रणेपर्यंत विविध उपकरणांच्या माध्यमातून बदलत्या युद्धपद्धतींचे या वेळी दर्शन घडले. युद्ध केवळ शस्त्रांच्या ताकदीवर नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि जवानांच्या कौशल्यावरही अवलंबून असते, याबाबतची जाणीव या प्रदर्शनातून झाली.

बचावतंत्राचे प्रात्यक्षिक

युद्धात जवान गंभीर जखमी झाल्यास त्याचे प्राण कसे वाचवावेत, याबाबतची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक हल्ल्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, कोणती संरक्षक साधने वापरावीत, याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली.

लष्करी कौशल्यांनी रंगत
लष्करी बँडचे सादरीकरण, ‘ड्रोन’ प्रात्यक्षिके, बायोनेट फायटिंग, लष्करी मार्शल आर्टस्, तायक्वांदो आणि खुकरी नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. चेंडू मेलम आणि मल्लखांबाच्या सादरीकरणालाही उपस्थितांनी प्रतिसाद दिला. याशिवाय सैन्यातील जवानांशी संवाद, प्रेरणादायी चित्रफिती आणि विविध कृती-आधारित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना लष्करी जीवनाची ओळख झाली.

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

Rohit Sharma 45 story: हिटमॅनच्या जर्सीवर '४५' नंबर कसा आला? आधी द्रविडचा अडथळा अन् मग आईचा सल्ला आला कामी

Teacher Recruitment : मुलाखतीसह शिक्षक भरतीच्या १० हजार ३२८ जागांवर ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस

Know Your Army Exhibition : शस्त्रास्त्रांसह युद्धकौशल्याचे दर्शन; मुंबईकरांना अनुभवता आले लष्करी सामर्थ्य!

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

SCROLL FOR NEXT