पुणे

तारळे ज्ञान शिदोरी दिन

CD

ग्रंथालयातून जातो ज्ञान समृद्धीचा मार्ग

डॉ. शिरीषकुमार लिमये; तारळे हायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शन

तारळे, ता. २२ : ज्ञान समृद्धीचा मार्ग हा ग्रंथालयातून जात असून, जीवन समृद्धीसाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा वापर करावा, असे मत सिंबायोसिस कॉलेजचे अधिव्याख्याता डॉ. शिरीषकुमार लिमये यांनी व्यक्त केले.
येथील हायस्कूलमध्ये आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, निवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत जाधव, संजय शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय बारटक्के, प्राचार्य जयंत साळुंखे, ग्रंथपाल प्रकाश संघमित्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
येथील श्री छत्रपती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यामंदिरात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात ज्ञान शिदोरी दिन झाला. त्याचे औचित्य साधून ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन झाले. ग्रंथालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले. प्रदर्शनात विविध विषयांवरील सुमारे ४०० पुस्तके होती.
बाल वाङ्‌मयातील ५० पुस्तके प्रदर्शनात होती. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, संत गाडगेबाबा, साने गुरुजी व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावरील पुस्तकेही प्रदर्शनात होती.
रद्दीद्वारे तयार केलेले अनेक प्रकल्प या प्रदर्शनात मांडले होते. ग्रंथालयप्रमुख संघमित्र यांच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प राबविला. प्राचार्य जयंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रंथपाल संघमित्र यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अतुल जाधव यांनी आभार मानले.

B01210
तारळे : ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना प्रा. लिमये. त्या वेळी मान्यवर.

.....................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT