पुणे

चांदण्या रात्रीत पुणेकरांचे सामूहिक दुग्धपान

CD

पुणे, ता. २५ ः निरभ्र आकाशातील तेजस्वी चंद्रप्रकाशात आटीव दुधाचा आस्वाद घेत आणि गाणी-गप्पांचा फड रंगवत पुणेकरांनी रविवारी कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. उद्यानांमधील मोकळ्या वातावरणात, तसेच सोसायट्यांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी एकत्र येत दुग्धपानाचा आनंद घेतला. या वेळी मंदिरांमध्ये दर्शनासह देवीची ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

शीतल चंद्रप्रकाशात उद्यानांमध्ये फेरफटका मारत कोजागरीचा आनंद लुटता यावा, यासाठी महापालिकेतर्फे शहरातील उद्याने रात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवण्यात आली होती. त्यामुळे सारसबाग, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, महाराणा प्रताप उद्यान यांसह विविध उद्यानांमध्ये नागरिकांनी आकाशातील पूर्ण चंद्राचे पिठूर चांदणे अनुभवले.

अनेक सोसायट्यांमध्ये, तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने चौकाचौकात यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध गाणी-गप्पा आणि कवितांसह मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या साक्षीने इमारतींच्या टेरेसवर कोजागरी पौर्णिमा साजरी झाली. पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घेत सहकुटुंब भोजनाचा आनंद घेण्यात आला. पौर्णिमेच्या पूर्णाकृती चंद्राने जणू साऱ्यांनाच जगण्याची नवी ऊर्जा दिली. सार्वजनिक मंडळांतर्फे ठिकठिकाणी मोठमोठ्या कढयांमध्ये मसाला दूध तयार केले जात होते. त्यामुळे आटीव दूध, केशर आणि सुकामेव्याचा सुवास परिसरात दरवळत होता.

रविवारी दिवसभर ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, भवानी माता मंदिर, काळी जोगेश्वरी, चतुःशृंगी मंदिर, वनदेवी मंदिर, तळजाई मंदिरासह उपनगरातील मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. स्त्रियांनी देवीची ओटी भरली. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी छोटेखानी मिरवणूक काढून नंतर मसाला दुधाचे प्राशन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान; भाजपची आज देशभरात निदर्शने

Aaditya Thackeray: हिंजवडीसाठी निधी मंजूर, तरीही कामे ठप्प; समस्यांबाबत आमदार आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

Gokul Chairman Election Latest News : 'गोकुळ'चा अध्यक्ष आमचाच होणार! तांत्रिक मुद्द्यांवर महायुतीचे नेते अडथळा आणणार नाहीत; सतेज पाटील यांचा मोठा दावा

'एकही वर्ष गेलेलं नाही, ज्या वर्षी मी काम केलं नाही' सचिन पिळगांवकर नेहमी स्वतःचंच उदाहरण का देतात? स्वत: सांगितलं कारण, म्हणाले…

Ambabai Temple Donations : अंबाबाई चरणी 20 लाखांचे सोने, 44 लाखांची चांदी; नवरात्रोत्सवात भाविकांकडून भरभरून दान, 36 लाखांवर रक्कमही खजिन्यात

SCROLL FOR NEXT