पुणे

कचरा डेपो हलविण्याची पतित पावन संघटनेची मागणी

CD

कोथरूड, ता. ३१ ः कोथरूडमधील कचरा डेपोमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, तसेच या रस्त्याने जाणा-या प्रवाशांना दुर्गंधी, वाहतूक कोंडी व वाहने घसरण्याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे येथील कचरा डेपो हलवावा, अशी मागणी पतित पावन संघटनेने केली आहे.

कोथरूडमध्ये आयोजित केलेल्या खासदार जनसंपर्क अभियानात पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांना यासंदर्भात निवेदन दिले. येथील डेपोमध्ये टाकण्यात येणारा कचरा गेले कित्येक दिवस हलविण्याची प्रक्रिया मंदगतीने सुरू आहे. कचरा वाहून नेणा-या वाहनांच्या डेपोत व डेपो बाहेर रस्त्यावर दुतर्फा मोठ्या रांगा लागलेल्या असतात. अनेकवेळा वर्तमानपत्रात बातम्या येऊनही अधिकारी व ठेकेदार काहीही करताना दिसत नाहीत. एका महिलेला कचरा वाहक गाडीने उडवल्याने अपंगत्व आले असून, ती दवाखान्यात महिन्याहून अधिक काळ उपचार घेत आहे, परंतु त्या कुटुंबाला ठेकेदाराकडून कोणतीही मदत वा विचारपूस करण्यात आलेली नाही.
पतित पावन संघटनेचे जालिंदर टेमघरे म्हणाले की, महापालिका पातळीवर निवेदने देऊन काहीही उपाययोजना न झाल्याने खासदारांना निवेदन दिले आहे. त्यातूनही मार्ग निघाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

SCROLL FOR NEXT