पुणे

कोडीत खुर्दमध्ये घरफोडी

CD

गराडे, ता. १८ : कोडीत खुर्द (ता. पुरंदर) येथे १५ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक तोळे सोने आणि पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने गस्त वाढवून चोरांचा छडा न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
कोडीत परिसरात दोन महिन्यांपूर्वी चोरांचा मोठा सुळसुळाट होता. त्यानंतर काही काळ शांतता होती, मात्र आता पुन्हा चोरी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या संदर्भात तलाठी तुळशीराम चौधरी यांना विचारले असता मला चोरीबद्दल माहित नाही असे त्यांनी सांगितले. उद्या चौकशी करून करतो सांगतो असे ते पुढे म्हणाले.
सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी ग्रामस्थांना सांगितले, की गावात यापूर्वीही चोऱ्यांच्या अफवा होत्या, मात्र पोलिस प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे. रात्रीच्या घटनेचा आढावा घेऊन चोरांचा तपास लावला जाईल. नागरिकांनी घाबरू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांच्यासोबत दिवाळी साजरी करणारे विशाल गोंडल कोण? हनुमान चालीसाही दिली भेट

Mumbai Local: चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये थरार! दोन प्रवाशांमध्ये जबर मारहाण, धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेमकं काय घडलं?

Sayaji Shinde Karjat Tree Felling Protest News : "पर्यावरण मंत्र्यांना पर्यावरणाचा किती गंध आहे?"; अभिनेते सयाजी शिंदे यांचा कर्जतमधील वृक्षतोडीवरून सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ईडीची मोठी कारवाई

Pune Metro: दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; ८ नोव्हेंबरला रात्री ८ नंतर सेवा बंद

SCROLL FOR NEXT