पुणे

पिलीव मध्ये इलेक्ट्रिक दुकान फोडून सव्वा लाखाची चोरी- चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज

CD

PIL26B00897
पिलीव (ता. माळशिरस) ः येथील कोहिनूर इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

पिलीवमध्ये इलेक्ट्रिक दुकान फोडून सव्वा लाखांची चोरी

पिलीव, ता. २० : माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कोहिनूर इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे मागचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना मंगळवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये २६ हजार रुपये किमतीची पॉलीकॅप केबल, २८ हजार रुपये किमतीची तांब्याची तार तसेच दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर व इतर सर्व सव्वा लाखांचा ऐवज अज्ञातांनी चोरून नेला.
याबाबत अज्ञाताविरुद्ध चेतन कैलास काळे यांनी माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. जानकर करीत आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीही याच दुकानात चोरीची घटना घडली होती. दिवसेंदिवस पिलीव परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT