पुणे

कोकण मराठा संस्थेचा स्नेहमेळावा उत्साहात

CD

पुणे, ता. ३ : कोकण मराठा समाजाची एकजूट आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेत झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला, तसेच डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील आणि दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. या वेळी डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कोकणची समृद्ध परंपरा आणि तेथील माणसांमधील जिव्हाळ्याच्या नात्यांचे महत्त्व सांगितले. ‘‘कोकणातील माणूस हा निसर्गासारखाच साधा, भोळा आणि प्रेमळ असतो,’’ असे गौरवोद्‍गार त्यांनी काढले, तसेच संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी रामचंद्र मोरे, राजेंद्र सोंडकर, शंकर मोरे, बाबाजी मोरे, अरविंद चव्हाण, रमेश मोरे, सुधाकर पाष्टे, प्रकाश मोरे, अजिता महापदी-जाधव आणि रोहन मोरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिलांना हळदी-कुंकू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष दत्ता जाधव, यश शिंदे, संदीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सुदर्शन जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: एक दोन चपाटी मारणे म्हणजे हल्ला करणं नसतं- आनंद दवे

SCROLL FOR NEXT