पुणे

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक प्रक्रीया सुरु

CD

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती
बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू
-----
कोल्हापूर ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (केडीसीसी) निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. ठराव गोळा करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. ११) सुरू झाली आहे, अशी माहिती विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी दिली. ठराव नऊ सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार साधारण १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे.
कदम यांनी सांगितले, की जिल्हा बँकेच्या संचालकांची पंचवार्षिक मुदत पाच जानेवारी २०२७ ला संपते. तत्पूर्वी १५० दिवस आधी निवडणूक प्रक्रिया सुरू करावी लागते. सध्या सभासदांकडून ठराव मागण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी दिला आहे. या काळात प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे ठराव दाखल करता येणार आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधकांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केली आहे. ज्या संस्थांचे सभासदत्व तीन वर्षांपूर्वीचे आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार असणार आहे. त्यामुळे पाच जानेवारी २०२४ पूर्वीच्या सभासद संस्थांना सभासदत्व दिले आहे. व्यक्तीगत गटातील मतदारांना पाच जानेवारी २०२५ म्हणजे दोन वर्षांपूर्वीचे सभासदत्व आवश्‍यक आहे. आजपर्यंत ६५५ व्यक्तीगत मतदार होते. सध्या केवळ दोन व्यक्तिगत आणि दोन संस्थांचे मतदार हयात आहेत. तरीही यादीत सर्वांची नावे सध्या आहेत.
दरम्यान, ज्या संस्थांचे भागभांडवल अपूर्ण आहे, त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. साधारण नऊ सप्टेंबरला ठराव दाखल झाल्यानंतर पुढील प्रत्येक टप्प्याचा अंदाज घेता, साधारण १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान केव्हाही मतदान होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT