कोल्हापुरात महसूलमंत्री
बावनकुळे यांचा जनसंवाद
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर ः शेतात बांध घालायला ट्रॅक्टर भाड्याने दिला, पण तहसीलदारांनी कारवाई करून ट्रॅक्टर जप्त केला. जमिनीचे हस्तांतरण पाठपुरावा करूनही होत नाही. आमच्या जमिनीबाबतची सुनावणी दोन महिने झाली घेतलेलीच नाही. अशा अनेक तक्रारी नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या. चार तासांत मंत्री बावनकुळे यांनी तब्बल ७२६ निवेदने स्वीकारली. रविवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात हा जनसंवाद कार्यक्रम झाला.
जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी वर्षानुवर्षे देवस्थानची जमीन कसत आहेत. ही जमीन कसणाऱ्याच्या नावे व्हावी, यासाठी सरकार कायदा करणार आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन, मात्र हा कायदा करण्याच्या समितीमध्ये शेतकऱ्यांचा समावेश करावा. लवकरात लवकर या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, असे निवेदन अखिल भारतीय किसान सभा यांनी दिले आहे.
आम्ही शेतीच्या सपाटीकरणासाठी ट्रॅक्टर भाडेपट्टीवर दिले होते; मात्र महसूल अधिकाऱ्यांनी हे ट्रॅक्टर जप्त केले आहेत. दंडाची रक्कम भरूनही अजून ट्रॅक्टर परत केलेले नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन नाही, असे निवेदन करवीर तालुक्यातील आमशी गावातील ट्रॅक्टर चालकांनी दिले. जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (गट - क) यांचे वेतन एस-८ वरून एस-१० व मंडळ अधिकाऱ्यांचे वेतन एस-१२ वरून एस -१४ करावे, अशी मागणी तलाठी संघटनेने केली असून, त्यांनी या बाबतचे निवेदन महसूल मंत्र्यांना दिले.
अमेरिकन बंगोलोची जागा सरकारने महसूल विभागाला परत मिळवून दिली त्याबद्दल अभिनंदन. आता ही जागा अतिक्रमणमुक्त करावी, असे निवेदन प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी मंत्री बावनकुळे यांना दिले. कोल्हापूर वाहतूक समन्वय समितीने ई-चलन रद्द करण्याचे निवेदन दिले. मंत्री बावनकुळे यांनी तत्काळ परिवहन मंत्र्यांना दूरध्वनीवरून या बाबत विचारणा केली. प्रत्यक्ष चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी समितीला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.