पुणे

महिला स्टोरी- मेघा वसंतराव पाटील

CD

पान ८ - २७ साठी
००००००००००००००००००००००००००००००००००
मसाला उद्योगामध्ये तयार केला ब्रॅण्ड
---------------------------
मौजे तासगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील २७ वर्षीय मेघा वसंतराव पाटील या युवतीने कुटुंबाच्या पाठबळावर मसाला प्रक्रिया उद्योगात यश मिळवले आहे. आज ‘उज्वल्स मसाले’ ब्रॅण्डअंतर्गत सुमारे ५० प्रकारचे मसाले तयार केले जातात. राज्याच्या विविध भागांत या मसाल्यांना वाढती मागणी आहे. लहान वयामध्ये मेघाने घेतलेली व्यावसायिक झेप दिशादर्शक आहे.
-------------------
राजकुमार चौगुले
-------------------
पुणे- बंगळूर महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावर असणारे हातकणंगले तालुक्यातील मौजे तासगाव हे शेतीप्रधान गाव. येथील मेघा वसंतराव पाटील या युवतीने शिक्षण संपताच नोकरीच्या शोधात धावपळ करण्याऐवजी स्वतःचा उद्योग उभा करत स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. गेल्या पाच वर्षांत ‘उज्वल्स मसाले’ हा ब्रॅण्ड परिसरातील बाजारपेठेत ओळखीचा झाला आहे. त्यामागे आहे एका मुलीची जिद्द, कुटुंबाचा पाठिंबा आणि गुणवत्तेवर असलेला अढळ विश्वास. मेघा यांचे वडील वसंतराव पाटील हे शेतीबरोबरच पोल्ट्री व शेळीपालन व्यवसाय करतात. भाऊ उद्ज्वलसिंह हे शेतीपूरक व्यवसायाला मदत करतात.

‘सीए’चे प्रयत्न सोडून मसाला उद्योगाकडे...
मेघा हिने एम.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सीए इंटरची तयारीही सुरू होती. मात्र काही कारणांमुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर नोकरीच्या संधी शोधल्या; पण मनासारखी नोकरी मिळाली नाही. अशा काळात अनेक जण तडजोड करतात; मात्र मेघाच्या आयुष्यातील हा टप्पा वेगळ्या वाटचालीचा ठरला. वडील वसंतराव पाटील आणि भाऊ उज्वलसिंह पाटील यांनी मेघाला स्पष्ट सांगितले, “नोकरी नसेल तर काही हरकत नाही. स्वतःचा व्यवसाय उभा कर.” ही केवळ प्रेरणा नव्हती, तर तिच्या क्षमतेवर ठेवलेला विश्वास होता. ग्रामीण भागात मुलीला स्वतंत्र प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देणारी उदाहरणे आजही फारशी दिसत नाहीत. पण पाटील कुटुंबाने सामाजिक चौकटी पलीकडे जाऊन मुलीला संधी दिली. याचा सकारात्मक परिणाम मेघाच्या मनावर झाल्याने नव्या उत्साहाने मसाला प्रक्रिया व्यवसायाला सुरवात केली.
मेघाला लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती. मसाल्यांची चव, सुगंध आणि त्यामागील प्रक्रियेत तिला रस वाटायचा. त्यातूनच मसाला उद्योगाची कल्पना आकाराला आली. २०१९-२० दरम्यान पुणे आणि कोल्हापूर येथे मसाला निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. मसाले तयार करताना कोणते घटक किती प्रमाणात वापरायचे, भाजणी कशी करायची, गुणवत्ता कशी राखायची, उत्पादनाचे प्रमाण कसे वाढवायचे याचा सखोल अभ्यास केला. प्रशिक्षणानंतर २०२१ मध्ये घरातूनच मसाला निर्मितीची सुरुवात झाली. एक छोटे पल्व्हरायझर आणि पॅकिंग मशीन एवढ्याच भांडवलावर प्रक्रिया उद्योग सुरू झाला. सुरुवातीचे दिवस आव्हानात्मक होते. उत्पादन, विक्री, मार्केटिंग, ग्राहकांशी संपर्क अशा सर्व जबाबदाऱ्या मेघालाच सांभाळाव्या लागत होत्या. मात्र गुणवत्तेवर विश्वास असल्यामुळे मेघा मागे हटली नाही. उत्पादनाला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर वडील आणि भावाने पुढाकार घेत तिला स्वतंत्र प्रक्रिया युनिट उभे करून दिले. आज या युनिटमध्ये कांडप मशीन, मिक्सिंग मशीन, ओला मसाला मशीन, पॅकिंग मशीन आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.
मेघाने ‘उज्वल्स मसाले’ हे ब्रॅण्डनेम भावाच्या नावावरून ठेवले. या नावात कुटुंबाचा विश्वास आणि भावनिक नाते दोन्ही दडलेले आहे. आज या ब्रॅण्डअंतर्गत चिकन मसाला, मटन मसाला, कोल्हापुरी मसाला, बिर्याणी मसाला, पुलाव मसाला, घाटी मसाला, काळा मसाला, किचन किंग मसाला, पंजाबी मसाला, कांदा-लसूण मसाला, शेंगदाणा चटणी, जैन चटणी यासह सुमारे ५० प्रकारची उत्पादने तयार केली जातात. ग्राहकांच्या मागणीनुसार २५ ग्रॅम ते एक किलो पॅकिंगमध्ये मसाले उपलब्ध केले जातात. वर्षाला सात लाख रुपयांची उलाढाल होते. खर्च वजा जाता ३५ टक्यांपर्यत नफा मिळतो. या व्यवसायामध्ये कुटुंबाची पंधरा लाखांची गुंतवणूक केली आहे. नोव्हेंबर ते मे या कालावधीत मसाला निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी सर्व प्रमाणपत्रे मेघाने मिळवली आहेत.

दररोज पन्नास किलो मसाला निर्मिती ः
मेघाच्या यशामागे गुणवत्तेबाबत तडजोड न करणारी भूमिका महत्त्वाची आहे. मसाल्याचा दर्जा टिकवण्यासाठी मेघा ब्याडगी मिरची थेट कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबरपासूनच खरेदी करते. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याने ग्राहकांना चांगला दर्जा मिळतो आणि शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळतो. दलालांची साखळी कमी झाल्याने व्यावसायिक फायदा होतो.
आज मेघाच्या प्रकल्पामध्ये दररोज सरासरी ५० किलोहून अधिक मसाले आणि चटण्या तयार होतात. उत्पादन, पॅकिंग आणि वितरणाची संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने केली जाते. कोल्हापूर, जयसिंगपूर, पेठवडगाव परिसरातील बाजारपेठांमध्ये उज्वल्स मसाल्यांची विक्री होते. विविध गावातील चिकन सेंटर, बझार, मेस, हॉटेल्स आणि किरकोळ विक्रेते मसाल्यांचे नियमित ग्राहक आहेत. काही उत्पादनांनी दुबईपर्यंतही मजल मारली आहे. नोव्हेंबर ते मे अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात मसाला निर्मिती होते. सुरवातीच्या काळात व्यवसाय वाढविताना मेघाने ग्राहकांचा विश्वास मिळविण्यावर भर दिला. नवीन ब्रॅण्ड असल्यामुळे सुरुवातीला दुकानदारांना मसाला विकून झाल्यानंतर पैसे देण्याची सुविधा दिली. काही ठिकाणी चव तपासण्यासाठी मोफत नमुने दिले. “आधी वापरून बघा, मग ग्राहकांना सांगा,” हा त्यांचा दृष्टिकोन होता. भावाबरोबर स्वतःही अनेक बझार, स्टॅालवर जावून मसाल्याची वैशिष्ठे सांगितली. यानंतर हळूहळू ग्राहक वाढत गेले. बाहेरगावांबरोबरच स्थानिक ठिकाणचे विविध पदार्थ तयार करणाऱ्या हातगाड्यांवरही मसाल्यांना मागणी वाढू लागली. काही सूचनाही येवू लागल्या. त्यातूनच बाजारपेठेत विश्वास निर्माण झाला. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफार्मवरुनही मसाल्यांची विक्री केली जाते.
आज या उद्योगातून चार महिलांना नियमित रोजगार मिळत आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत कामकाज चालते. गावातील महिलांच्या हाताला वर्षभर काम आणि आर्थिक स्वावलंबन मिळावे, यासाठी मेघा विशेष प्रयत्न करते. महिलांशी सातत्याने संपर्क ठेवण्यासोबतच त्यांच्या अडीअडचणीत मदतीला जाते. तिच्या मते, उद्योगाचा खरा आनंद केवळ नफ्यात नसून इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यात आहे.
---------------
इन्फो ः

कुटुंबाची भक्कम साथ ः
वडील वसंतराव पाटील यांचा विचार मेघाच्या यशोगाथेचा केंद्रबिंदू आहे. “मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. तिने कुणासमोर हात पसरू नये. तिच्या हाताखाली आणखी काही कुटुंबे उभी राहिली पाहिजेत,” हा त्यांचा दृष्टिकोन आज अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. मुलगी असल्यामुळे तिच्या स्वप्नांना मर्यादा घालण्याऐवजी तिला प्रक्रिया उद्योग उभारून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो यशस्वी ठरला. मेघाच्या मते, नोकरीपेक्षा व्यवसायाने अधिक आत्मविश्वास दिला. कमी वयातही व्यवहारकुशलता, लोकांशी संवाद, निर्णयक्षमता आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद व्यवसायामुळे मिळाली. आज मेघा केवळ युवा उद्योजिका नाहीत, तर अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. येत्या काळात इन्स्टंट आणि प्रीमिक्स उत्पादनांच्या सोबतच ‘रेडी टू इट’ मिसळ, पांढरा रस्सा आणि अन्य खाद्यपदार्थ बाजारात आणण्याचे मेघाने नियोजन केले आहे.
-----------------------------------------------------
संपर्क ः मेघा पाटील, ८७६७८३१९६९
------------
छायाचित्रे ः राजकुमार चौगुले
--------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

IND vs IRE, T20I: पोरं तर पोरं, आयर्लंडच्या पोरींनी पण भारताला हरवल्याचं केलं भन्नाट सेलिब्रेशन; Video Viral

Latest Marathi News Live Update : महापौर हिमगौरी आडके अतिक्रमणांविरोधात रस्त्यावर, अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई

Tilari National Park : कोकणचे 'अ‍ॅमेझॉन' आता बदलणार! सिंधुदुर्गात होणार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने भव्य नॅशनल पार्क, जाणून घ्या सरकारचा मेगा प्लॅन?

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

SCROLL FOR NEXT