पुणे

ऊस दराबाबतची बैठक फिस्कटली

CD

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : कारखानदारांचा प्रतिटन ३९०० रुपये आणि हंगाम संपल्यावर १०० रुपये दराचा प्रस्ताव शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आज रात्री येथे झालेल्या बैठकीत फेटाळला. त्यामुळे ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक फिस्कटली. त्यानंतर शेतकरी संघटनांनी उद्या (ता. ६) कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत बंदची हाक दिली. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी उत्‍स्‍फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.
बैठकीत प्रतिटन चार हजार रुपये विनाकपात पहिली उचल या मागणीवर संघटना ठाम राहिल्या. कारखानदारांनी शंभर रुपयांसाठी शेतकऱ्यांची थट्टा केली असून हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही महामार्गावरील आंदोलन सुरूच ठेवणार, असा पवित्रा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटना, जय शिवराय शेतकरी संघटना, शिवसेना शेतकरी सेना, शरद जोशी शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पोवार, स्वस्तिक पाटील, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्ड्यान्‍नावर यांनी कारखानदारांशी चर्चा केली. सुमारे चार तास बैठक चालली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti: ६१ तासांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे; उसाला ४,२०० रुपयांपर्यंत दर

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा! ईडीची केस बंद; प्रकरण काय?

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकीकडे ८७ लाखांची सायबर फसवणूक, तर दुसरीकडे लाखोंचे दागिने अन् रोकड लंपास

Pune News: सकाळी साडेअकराची बैठक थेट दुपारी चारनंतर! पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची टीका

Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..

SCROLL FOR NEXT