कोल्हापुरातील धरणांत १९.७७ टीएमसी पाणीसाठा
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या १९.७७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये वारणा धरणात सर्वाधिक ११.२५ टीएमसी, तर राधानगरी धरणात १.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. दुधगंगा धरण वगळता इतर धरणांतून पिण्यासह शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने नद्यांवरील उपसाबंदी लागू करून ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी शुक्रवारपासून (ता. १९) तीन दिवसांसाठी उपसाबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे दुधगंगा धरण वगळता इतर धरणांमधील पाणी शेती आणि पिण्याच्या गरजांसाठी वापरले जात आहे.
जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार सध्या बहुतांश धरणांतून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसल्याने आगामी काळात पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना विभागास मोठी कसरत करावी लागू शकते.
प्रमुख धरणांतील पाणीसाठा
धरण पाणीसाठा (टीएमसी) साठा (टक्क्यांत)
राधानगरी १.९३ २३
तुळशी १.४० ४०
वारणा ११.२५ ३३
दुधगंगा २.०३ ८
कासारी ०.६२ २२
कडवी ०.७४ ३०
कुंभी ०.८५ ३१
पाटगाव ०.९५ २६
--
कोल्हापूर : राधानगरी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटला असून धरणात सध्या १.९३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. (छायाचित्र : राजकुमार चौगुले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.