ION Digital Center
ION Digital Center sakal
पुणे

Pune News : महिला उमेदवार भरतीला मुकल्या! विवाह प्रणापत्रावरून नाकारला प्रवेश

सम्राट कदम

पुणे - कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरतीसाठी मी अर्ज केला होता. गुरुवारी (ता.२९) सकाळी आवश्यक कागदपत्रांसह हडपसर येथील रामटेकडीच्या आयऑन डिजिटल केंद्रावर दाखल झाले. माझ्यासोबत माझा नवरा आणि लहान मूलही होते. सर्व तपासून आम्हाला परीक्षेला बसविण्यात आले. मात्र, नंतर लग्नाचे प्रमाणपत्र जुने असल्याचे सांगत बळजबरी बाहेर पाठविले.

पहिल्या सत्रात माझ्यासारख्या ६० हून अधिक महिला उमेदवारांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. माझी वयोमर्यादा यावर्षी संपेल, सांगा मी न्याय मागायचा तरी कुणाकडे, अशा शब्दात ४० वर्षीय विवाहीत महिलेने ‘सकाळ’कडे आपली कैफियत मांडली.

हडपसर परिसरातील ‘आयऑन डिजिटल झोन आयडीझेड रामटेकडी, सहयोग डिजिटल हब’ या परीक्षा केंद्राविषयी ही सलग दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी योग्य सूचना फलक न लावल्यामुळे आयबीपीएसच्या परीक्षेला उमेदवार मुकले होते. ‘सकाळ’शी बोलताना वसुधा (नाव बदललेले) सांगतात, ‘परीक्षा अर्ज रीतसर भरल्यानंतरच आम्हाला कोल्हापूर जिल्हापरिषदेकडून प्रवेशपत्र देण्यात आले होते.

परीक्षा केंद्रावर मी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. पण हे जुने असून, नवे प्रमाणपत्र दाखवा, असे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही पुराव्यासाठी लग्नाआधीचे नाव असलेले आधारकार्ड, इतर कागदपत्रे दाखविली पण त्यांनी आमचे काही ऐकले नाही. बळजबरी विवाहीत महिलांना बाहेर काढले. हा आमच्यावर अन्याय आहे. घरदार सांभाळून अभ्यास करत आम्ही ही परीक्षा देतोय, पण केंद्रावरचा हा मनमानी कारभार आमच्यावर अन्याय करत आहे.’

पहिल्या सत्रात ६० हून जास्त विवाहीत महिलांना बाहेर काढल्याचे वसुधा सांगतात. काळ्या कपड्यातील बाऊंन्सर लोक आमच्याशी अरेरावीने वागले, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान यासंदर्भात हडपसरच्या या डिजिटल केंद्रातील प्रमुखांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण, कोणताही समाधानकारक मार्ग मिळाला नाही.

उमेदवारांचे आरोप -

- जुने होतो म्हणून विवाह प्रमाणपत्र का नाकारले?

- लग्नापूर्वीचा पुरावा किंवा लग्न पत्रिका का गृहीत धरली नाही?

- परीक्षेसंदर्भात दाद मागण्यासाठी कोणीच अधिकारी का उपस्थित नाही?

- परीक्षा केंद्रावरील कर्मचारी अरेरावी का करत होते?

- विवाह प्रमाणपत्राच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रकार होता का?

सुविधांचा अभाव...

हडपसर येथील डिजिटल आयऑन केंद्रावर परीक्षेसाठी उमेदवाराबरोबरच पालकही येतात. माझ्या पत्नीसोबत मी आलो तर मला बाहेर तीन तास उन्हात उभे राहावे लागले. सोबत लहान मुलगाही होता. परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्यापासून ते प्रसाधनगृहापर्यंत कोणतीच व्यवस्था नाही. राज्यभरातून उमेदवार परीक्षा केंद्रावर येतात निदान मूलभूत व्यवस्था तरी असायला हवी, अशी अपेक्षा परीक्षार्थीच्या पतीने व्यक्त केली.

उमेदवारांची संख्या भरपूर आहे. आधीच बसायला जागा नाही, तुमच्याकडे कागदपत्र नाही, तुम्ही निघा.. अशा भाषेत आमच्याशी बोलण्यात आले. विवाह प्रमाणपत्र जुने आहे, म्हणून परीक्षेलाच बसू न देणे हा कोणत्या न्याय? आमचे कोणी ऐकणार का नाही?

- मोहिनी (नाव बदललेले)

माझ्या बायोकोसोबत मी आलो होतो. मागील काही महिन्यांपासून ती सरळसेवा भरतीची तयारी करते. आधीच्या परीक्षांना याच विवाह प्रमाणपत्रामुळे नाकारले नाही. मात्र, आज का नाकारले? तीने खूप मेहनतीने तयारी केली आहे. हा आमच्यावरचा अन्याय आहे.

- सुरेश जाधव (उमेदवारेच पती)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 1 जून 2024

Latest Marathi News Live Update: शेटवच्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरूवात

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT